तरुण भारत

कामेरीच्या आरोहीने वानरलिंगी सुळकाही केला सर

प्रतिनिधी / नागठाणे :

कामेरी (ता.सातारा) येथील बालगिर्यारोहक आरोही लोखंडे हिने नुकताच जुन्नर (जि.पुणे) येथील वानरलिंगी सुळका अवघ्या पन्नास मिनिटांत पार करून सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने वजीर सुळका अवघ्या तीस मिनिटात सर केला होता.

Advertisements

साताऱ्यातील कामेरी या गावात राहणाऱ्या आरोही सचिन लोखंडे या सहा वर्षाच्या मुलीने संविधान दिनाचे औचित्य साधून घाटघरच्या परिसरातील चढाईसाठी अतिकठिण श्रेणीत गणला जातो. सुमारे 450 फूट उंचीचा वानरलिंगी सुळका अवघ्या पन्नास मिनिटांत पार करत दुसरा थरारक विक्रम स्वतःच्या नावावर करत गाव तसेच तालुक्यासहित सातारा जिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आरोही लोखंडे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कामेरीच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत आहे. आरोहीने वानरलिंगी सुळका तसेच जीवधन किल्लाही तीने त्याच दिवशी सर केला आहे. यापूर्वी माहुलीच्या शेजारी उभा असलेला 280 फूट उंचीचा वजीर सुळका 30 मिनिटांत सर केला होता.

वडिल सचिन लोखंडे यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन आरोहीने सहाव्या वर्षीच 15 दिवसाच्या अंतराने जुन्नर येथील जीवधन किल्ल्याचा पहारेकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा वानरलिंगी सुळका पार केला. तिच्या सुळक्यांच्या यादीत अजून एक चित्त थरारक सुळक्याची भर कमाई केली आणि या सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर भारतीय तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली. तिच्यासोबत कामेरीमधून तिचे सहकारी वडील सचिन लोखंडे, रुद्र लोखंडे, छोटी बहीण प्रज्ञा लोखंडे, प्रशांत सुतार हे उपस्थित होते. तसेच या प्रोत्साहन प्रसंगी पॉईंट ब्रेक एडव्हेचर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Stories

सातारा : शासनाच्या अनागोंदी कारभाराचा आर्थिक भुर्दंड पालकांना कशासाठी?

datta jadhav

प्रविध जाधव यांचा क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्याकडून सत्कार

Amit Kulkarni

कराचीत होणार ऑनलाईन शिवजयंती

Patil_p

सातारा : वर्णे ग्रामपंचात निवडणूक स्थगितीची मागणी

Abhijeet Shinde

आईनेच घोटला मुलांचा गळा

Patil_p

निवडणूक पदवीधरांची प्रचारात उठाठेव राजकारण्यांची

Patil_p
error: Content is protected !!