तरुण भारत

सोमय्या आणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार

ऑनलाईन टीम/तरुण भारत

येत्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार आहे. त्यात शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. मात्र, सोमय्या यांनी या चारही मंत्र्यांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. किरीट सोमय्या आज अमरावतीत आले आहेत. यावेळी त्यांनी सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

डिसेंबरमध्ये आणखी 3 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी आणखी तीन नेते आपल्या रडारवर असल्याचे म्हटले आहे. सोमय्या यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, ”ठाकरे सरकारच्या 3 नेत्यांचे घोटाळे डिसेंबरमध्ये उघड करणार… उद्या मी अमरावती आणि परवा जालन्यात असणार”, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

Rohan_P

अर्थव्यवस्थेत ४ दशकातील सर्वात मोठी घसरण

Amit Kulkarni

लोकांना कर्ज नको, थेट खात्यात पैसे द्या : राहुल गांधी

Rohan_P

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : छगन भुजबळ

prashant_c

कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा राज्यस्तरीय महामेळावा रविवारी कोल्हापुरात

Abhijeet Shinde

कोरोनामुळे यूपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली 

Rohan_P
error: Content is protected !!