तरुण भारत

ट्विटरच्या सहसंस्थापकांचं पराग अग्रवालांविषयी मोठं विधान

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डोर्से यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे. पराग अग्रवाल यांच्या नावाची घोषणा केल्यांनतर ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देताना पहिलं कारण पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती हे सांगितलंय. जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा देताना ३ प्रमुख कारणं सांगितली आहेत. या ३ पैकी पहिलं कारण नवनियुक्त पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती हे सांगितलंय. मात्र हे कारण त्यांनी पराग अग्रवाल यांच्या क्षमतांवरील विश्वास यामुळेच दिलंय. त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना देताना पराग अग्रवाल यांचं तोंड भरून कौतुक केलंय.

Advertisements

Related Stories

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 48 हजार 872 वर; 10,963 मृत्यू

Rohan_P

देशातील 6 नव्या मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन

Patil_p

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात दाखल

datta jadhav

दक्षिण भारतात सलग 26 दिवस मुसळधार, Red Alert जारी

Abhijeet Shinde

चिंता वाढली : औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 742 वर

Rohan_P

पश्चिम बंगालला ‘यास’ चक्रीवादळाचा तडाखा; ममता बॅनर्जी म्हणाल्या…

Rohan_P
error: Content is protected !!