तरुण भारत

कर्नाटक : लॉकडाउन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी काही शैक्षणिक संस्थांमधील कोविड-19 प्रकरणे आणि जगाच्या काही भागांमध्ये कोविड विषाणूचा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनचा शोध या दरम्यान कोणत्याही संभाव्य लॉकडाऊनबद्दलची भीती नाकारली. ही शंका दूर करत त्यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की लोकांनी ओमिक्रॉनबद्दल घाबरू न जाता त्यांना कोव्हीड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी लॉकडाउनविषयीची शंका दूर करत त्यांनी राज्यात लॉकडाउन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.


“आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कडक सावधगिरीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु त्या बंद करू नका. लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे मुख्यमंत्र्यांनी लोकांना ओमिक्रॉनबद्दल घाबरू नये असे आवाहन केले आणि त्यांना कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगिताना ते म्हणाले की ज्या देशांत ओमिक्रॉन प्रकार आढळला त्या देशांतून आलेल्यांची विमानतळांवर तपासणी केली जात असून त्यांची चाचणी नकारात्मक आली तरच त्यांना शहरांमध्ये प्रवेश दिला जाईल.

Advertisements

Related Stories

बेळगावातून महाराष्ट्रात दररोज धावताहेत 49 बसेस

Patil_p

कोरोना योद्धांचा सन्मान

Amit Kulkarni

रबर-फोम शीटच्या मखरांनी सजली बाजारपेठ

Amit Kulkarni

बदल घडवून विकास साधा

Patil_p

कर्नाटक: कोरोनाचे ५० टक्केहून अधिक रुग्ण बरे

Abhijeet Shinde

निपाणी तालुक्यात यात्रा, बाजार बंदी

tarunbharat
error: Content is protected !!