तरुण भारत

मराठा आरक्षणासाठी पंचायत समिती सदस्याचा राजीनामा

प्रतिनिधी/मिरज

ओबीसी आरक्षणासाठी मुंडण करुन घेतलेले भाजपाचे मिरज पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती विक्रम पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामास्त्र उगारले. मंगळवारी मराठा समाजाच्या शेकडो बांधवांसमवेत त्यांनी सभापती सौ. गितांजली कणसे, उपसभापती अनिल आमटवणे यांच्याकडे सदस्यत्वचा राजीनामा सुपूर्द केला. मराठा आरक्षणास विलंब होत असल्याबद्दल यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. मराठा आरक्षणासाठीच्या पाटील यांच्या राजीनाम्याकडे जिह्यातील राजकारण्यांचे लक्ष मात्र वेधले.

मराठा आरक्षणासाठी कै. आण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. त्यास 40 वर्षे लोटले तरी आजतागायत आरक्षण मिळाले नाही. सध्याचे महाआघाडीचे शासन याबाबत ठाम भुमिका मांडण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे या शासनाच्या निषेधार्थ आणि आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे विक्रम पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. हीच कै.आण्णासाहेब पाटील यांना आमची आदरांजली असेल. आरक्षणासाठी आता आमचा यापुढे आक्रमक लढा सुरू राहिल, असेही पाटील यांनी यावेळी जाहीर केले. तत्पूर्वी त्यांनी पंचायत समिती विश्रामगृह येथून पाठींबा दिलेल्या अनेक बांधवांसह एकत्रित घोषणा देत पंचायत समिती आवारात प्रवेश केला.

Advertisements
   

Related Stories

जग चिंतेत मात्र चीनने तालिबान पुढे केला मैत्रीचा हात

Abhijeet Shinde

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न,पिडितेला चालत्या रेल्वेमधून फेकले

Abhijeet Shinde

शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी सांगलीत निदर्शने

Abhijeet Shinde

राहुल गांधींचा वाढदिवस असा होणार साजरा

Abhijeet Shinde

सोलापुरात आज 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी पार

datta jadhav
error: Content is protected !!