तरुण भारत

साताऱ्यात पूर्वप्राथमिक शिक्षिका, सेविका संघाचे थाळीनाद आंदोलन

प्रतिनिधी / सातारा :

आपल्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि जिल्हा परिषदेच्या बाहेर थाळीनाद आंदोलन केले. यावेळी त्यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना पाठवले.

Advertisements

त्या निवेदनात म्हटले आहे, स्वतःचा जीव, कुटुंब धोक्यात घालून अंगणवाडीचे कामकाज करून कोरोना कालावधीत जादा काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना थकित 19 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा. बीएलओचे मानधन दीपावली पूर्वी अदा करणे गरजेचे असतानाही ते मानधन अद्याप मिळालेले नाही. थकित मानधन मिळाल्याशिवाय यापुढे महिला बीएलओचे काम करणार नाहीत. संबंधीत महिलांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात यावी. स्वतःची मिनी अंगणवाडी सांभाळून नियमित अंगणवाडीचा पदभार सांभाळणाऱ्या जिल्ह्यातील संबंधित मिनी अंगणवाडी सेविका यांना नेहमीच अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक देण्यात यावी.

त्यांना ऑगस्ट 2021 पासून नियमित अंगणवाडी सेविकांचा दर्जा मिळावा. त्यांना पूर्व लक्षी प्रभावाने मानधन देण्यात यावे. सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्त होऊनही एक ते दोन वर्ष पेन्शनचा लाभ मिळालेला नाही, तो त्यांना त्वरित देण्यात यावा. मदतनीस यांना सेविकेच्या 75 टक्के मानधन मिळावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी मंगल पाटील, सुजाता बोबडे, सुरेखा डोळसे, शोभा जाधव, सुरेखा पवार, अलका झेंडे, पुष्पा वेदपाठक, मालन घोरपडे, छाया पन्हाळकर, शशिकला बोराटे, पूजा आटपाडकर, राजश्री गाडे, कमल शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.

Related Stories

सातारा : दागिने चोरीप्रकरणी तिघांना अटक

Abhijeet Shinde

सातारा : वाजत गाजत मिरवणूक काढल्याप्रकरणी ‘त्या’ गणेश मंडळावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱयाला सहा महिन्यांची कैदेची शिक्षा

Patil_p

पोलिसांना मिळाले अखेर मास्क अन् सॅनिटायझर

Patil_p

जिल्हा परिषदेच्या सभेची रंगीत तालमीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीवर खल

Amit Kulkarni

घरावरच उभारला शिवरायांचा पुतळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!