तरुण भारत

राधानगरी तालुका गटाची निवडणूक बिनविरोध होईल : ए.वाय.पाटील

अनेक पक्षांचा पाठिंब्यासह शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

सरवडे / प्रतिनिधी

राष्ट्रवादीसह मित्र पक्षांतील १९८ पैकी १९० मतदारांचे पाठबळ असल्यामुळे राधानगरी तालुका सेवा गटातील निवडणूक बिनविरोध होणार आहे. तालुक्यातील नेत्यांनी मतमतांतर बाजूला ठेवून पाठबळ देण्याचा निर्णय जिल्ह्यातील राजकारणाला नवीन आदर्श देणार आहे,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. कोल्हापूर येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा संस्था गटातून त्यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला ,यावेळी झालेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे कृष्णराव किरूळकर होते.

श्री पाटील म्हणाले, जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच मी यशस्वी झालो. या निवडणुकीत तालुक्यातील काँग्रेस, जनता दल, शेकापक्ष ,शेतकरी संघटना यांच्या सह मित्रपक्षांनी माझ्या पाठीशी पाठबळ उभा केल्याने आता माझी जबाबदारी वाढली आहे. उदयसिंह पाटील म्हणाले, राधानगरी व करवीर या दोन्ही तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करणे या जबाबदाऱ्या नेत्यांच्या आहेत. या निवडणुका बिनविरोध झाल्यास जिल्ह्याला वेगळी दिशा मिळेल.अरुण डोंगळे म्हणाले की, ए. वाय यांची निवडणूक बिनविरोध आहे. मुश्रीफ यांनी त्यांच्यावर बँकेची जबाबदारी प्रथमच सोपवावी.

गोकुळ संचालक किसन चौगुले यांनी स्वागत केले.यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव चौगुले ,पी. डी. धुंदरे ,कृष्णराव किरुळकर ,एकनाथ पाटील, भैया माने ,नवीद मुश्रीफ, संजय पाटील याची भाषणे झाली. यावेळी विश्वनाथ पाटील, संजय कलिकते, राजेंद्र पाटील ,उमेश भोईटे, रवीश पाटील ,सुशील पाटील, फिरोजखान पाटील, भिकाजी एकल , दत्तात्रय पाटील, रवी पाटील अभिषेक डोंगळे, बी .आर. पाटील, धीरज डोंगळे,ए. डी.चौगुले,ए. डी. पाटील, नेताजी पाटील,युवराज वारके ,एकनाथ पाटील विनय पाटील उपस्थित होते. मोहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.आर. वाय. पाटील यांनी आभार मानले.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर : कोरोना रूग्णांचा आकडा 2 लाखांवर!

Abhijeet Shinde

तर अशोक चव्हाणांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, सकल मराठा क्रांतीचा इशारा

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांनो माती परिक्षण करा – दिलीप चव्हाण

Sumit Tambekar

मराठा आरक्षणासाठी 25 ऑक्टोबरपासून पुन्हा दौरा सुरु

Abhijeet Shinde

भटक्या जनावरांसाठी ‘अॅनिमल अॅम्ब्युलन्स’ देणार : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

अर्थसंकल्पातून संशोधन, कौशल्य विकासाला बळ; कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे मत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!