तरुण भारत

कोकरूड पोलिसांची घेतली कायदेविषयक परीक्षा

कोकरूड/प्रतिनिधी

शिराळा तालुक्यातील कोकरूड पोलीस ठाण्यातील पोलीस अम्मलदारांची कायदेविषयक परीक्षा डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी घेऊन मार्गदर्शन केले. कोकरूड ता. शिराळा येथील मंगल नारायण हॉल मध्ये पोलिसांच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 21 पोलीस अंमलदारांनी परीक्षेत भाग घेतला. यावेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे, एपीआय ज्ञानदेव वाघ उपस्थित होते.

पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये, भारतीय दंड संविधान – 30 गुण, भा.प्र. संहिता – 30 गुण, भा.पु. कायदा – 20 गुण, किरकोळ कायदे – 20 गुण असे वर्गीकरण करण्यात आले होते. या परीक्षेतील प्रथम क्रमांकास – 2000 रुपये, द्वितीय क्रमांकास – 1500 रुपये, तृतीय क्रमांकास – 1000 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सदरचा अहवाल मा. पोलीस अधीक्षक यांचेकडे पाठवून शिफारस करून मंजूर झाल्यावर बक्षिसे देण्यात येणार आहेत.

डीवायएसपी कृष्णात पिंगळे म्हणाले की, कायद्याचे ज्ञान वाढावे, प्रत्येक पोलीस कायद्याच्या बाबतीत अपडेट रहावा, नवनवीन कायद्यांची ओळख व अभ्यास व्हावा या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली होती. सर्व पोलिसांनी कर्तव्यदक्ष राहणे गरजेचे आहे असेही ते शेवटी म्हणाले.

Advertisements

Related Stories

सांगलीत एफआरपी बाबत तोंड बंद का ?

Abhijeet Shinde

सांगली : मिरज रेल्वे जंक्शन परिसरात नशेखोरांचा हैदोस

Abhijeet Shinde

आघाडीची सरशी, भाजप नंबर वन!

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचे अवघे दोन टक्के रूग्ण बेडवर

Abhijeet Shinde

सांगली : ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर्ससाठी १ कोटी १६ लाख

Abhijeet Shinde

आता घर बसल्या मिळणार नवरात्र संगीत मैफिलीची मेजवानी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!