तरुण भारत

राज्यात शंभर टक्के सत्ताबदल होणार: प्रवीण दरेकर

सरकार सर्व आघाड्यावर अपयशी

सांगली/प्रतिनिधी

Advertisements

राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहेत. महिला असुरक्षित आहेत. खून, दरोडा, अत्याचारात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. उद्योग , व्यवसाय ठप्प आहेत. सातत्याने बलात्कार, विनयभंगाच्या घटना घडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एकूणच राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली. तसेच दिल्लीतील आंदोलनात शेतकऱ्यांच्या बळीचे भांडवल करणाऱ्या संजय राऊत यांनी ४३ एसटी कर्मचार्यांचे बळी गेले. या पापाचे धनी कोण याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी बोलताना केले.

दरम्यान, राज्यात लवकरच सत्ताबदल होईल असे भाकितही त्यांनी यावेळी बोलताना केले. दरेकर म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्याला मागे नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. महापूर, अतिवृष्टीने बाधित शेतकरी, व्यापाऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली आहे. अनेक जण अजूनही मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकणासाठी संप सुरू आहे. हा प्रश्न समन्वयातून सोडविण्याची गरज आहे. कामगार संघटनाशी चर्चा न करता थेट कर्मचाऱ्यांशी चर्चा हवी, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Related Stories

मिरज शहर पोलीस ठाण्यातच तरुणाने घेतले पेटवून

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात ‘या’ सेवा घरपोच सुरू राहणार

Abhijeet Shinde

गुरुद्वारा नमाज पठणासाठी देणार जागा

Abhijeet Shinde

सांगली, कोल्हापूरसाठी महापुराचे विशेष पॅकेज : डॉ.विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

मास्क न घातल्याने बल्गेरियाच्या पंतप्रधानांना 174 डॉलरचा दंड

datta jadhav

सांगली : मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भीषण आग

Abhijeet Shinde
error: Content is protected !!