तरुण भारत

भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या ठामपणे पाठीशी: प्रविण दरेकर

सांगली/प्रतिनिधी

एसटी महामंडळ शासनात विलिनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी न्याय्य असून, त्यांना न्याय नाही मिळाला तर हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडून मंजूर करून घेवू प्रशासनाने एसटी संघटनेने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असले तरी भाजपा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, अशी ग्वाही विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

मंगळवारी सांगली दौऱ्यावर आले असताना त्यांनी सांगली बसस्थानक परिसरातील आंदोलनस्थळी एसटी संपक-यांशी धावती भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्मचान-यांच्या अडीअडचणी प्रश्न जाणून घेतले. दरेकर म्हणाले, इतर राज्याच्या पतींवर राज्यातील एसटी महामंडळाचे विलीनीकरण झाले पाहिजे. ते होत नसेल तर कसे करायचे ते आम्ही सांगू. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटना आज संपात दिसत नाही आहेत. त्या निव्वळ पावती फाडण्यासाठी आहेत का? त्यांनी पुढे आले पाहिजे. संपकऱ्यांच्या मागण्या न्याय्य असून त्या मागण्या आम्ही विधानसभेत मांडून मंजूर करण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले.

यावेळी सपंकऱ्यांनी दरेकर यांना निवेदनाद्वारे शासनाची उदासिनता प शासनामुळे होत असलेला ताण कमी व्हावा, अन्यथा आत्महत्यांचे सत्र थांबणार नाहीचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.

या प्रसंगी आम. सुधीर गाडगीळ, भाजपा पृथ्वीराज पवार अश्रफ वानकर, गटनेता विनायक सिहासने, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी, माजी आमदार नितीन शिंदे, कामगार आघाडीचे अविनाश मोहिते आदीसह एसटी कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

नेर्लेच्या ‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबंध, पैशांच्या कारणावरून

Abhijeet Shinde

सांगली : सक्तीची वीज बिल वसूली तात्काळ थांबवा

Abhijeet Shinde

लिंगनूर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

इस्लामपुरातील अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू

Sumit Tambekar

”पंतप्रधान मोदींसह त्यांच्या साथीदारांनी हजारो किलोमीटर भूप्रदेश चीनला दिला”

Abhijeet Shinde

सांगली : अज्ञातांकडून ऊसाचे वाहन पेटवण्याचा प्रयत्न

Sumit Tambekar
error: Content is protected !!