तरुण भारत

तुमचीच माकडं, तुमची सर्कस

काँग्रेस संघटनेला उद्देशून जाखड यांचा ट्विट – कुठल्याही ‘शो’मध्ये माझा हस्तक्षेप नाही

वृत्तसंस्था / चंदीगड

Advertisements

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष देण्यात आल्याप्रकरणी एक ट्विट केला आहे. ‘आपके बंदर, आपकी सर्कस’ या म्हणीचे मी सार्थकपणे पालन करतो. मी कुणालाच कसलीच सूचना केलेली नाही तसेच इतरांच्या ‘शो’मध्ये हस्तक्षेप केला नसल्याचे म्हणत जाखड यांनी सिद्धू यांना लक्ष्य केले आहे.

नवज्योत सिद्धू यांनी संघटन निर्मितीवेळी जाखड यांची शिफारस मान्य केली नसल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा ट्विट केला आहे. जाखड यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पक्ष पदाधिकारी नियुक्त करण्यात आले नव्हते. पंजबा काँग्रेसमध्ये मी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, तेथे काय करायचे हे नवज्योत सिद्धू यांनाच माहित असे जाखड यांनी स्पष्ट केले आहे.

जाखड ट्विटवरून सातत्याने चर्चेत राहतात. पंजाबमध्ये राजकारण ड्रामा ठरले असून ते पूर्णपणे क्रिप्टोकरन्सीप्रमाणे आहे. जे विकले जाते खूप, पण विश्वासार्ह नाही असे त्यांनी ट्विट करत म्हटले होते. त्यांचा हा ट्विट सिद्धू यांच्याशी संबंधित असल्याचे मानले गेले. जाखड यांनी मागील काही काळात काँग्रेसच्या नेत्यांनाच अधिक लक्ष्य केले आहे. सध्या जुने प्रदेशाध्यक्ष अनेक ट्विट करत असल्याचे सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानावर जाखड यांनी शायरी ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते.

काँग्रेसने जाखड यांना हटवून नवज्योत सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद दिले होते. त्यानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यावर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव समोर आले होते. पण अखेरच्या क्षणी शिखबहुल राज्यात शीख मुख्यमंत्र्याचा मुद्दा उभा राहिला. या पार्श्वभूमीवर चरणजीत चन्नी मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून जाखड हे पक्षावर नाराज आहेत. जाखड हे पंजाबमधील काँग्रेसचा मोठा हिंदू चेहरा आहेत. काँग्रेस हिंदू मतदारांना आकर्षित करू पाहत आहे. अशा स्थितीत जाखड यांची नाराजी पक्षाला चांगलीच भोवणार असल्याची चर्चा आहे.

Related Stories

RBI च्या ट्विटर अकाऊंटने गाठला 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा

datta jadhav

‘निकटचा स्पर्श’ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

संशयित चिनी सैनिक ताब्यात

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेसमंड टुटू यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

Sumit Tambekar

देहरादूनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 93 वर

Rohan_P

कंगना ,अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग

Patil_p
error: Content is protected !!