तरुण भारत

सांगली जिल्हा बँक ही सर्वसामान्याची आर्थिक वाहिनी : संग्राम देशमुख

कडे : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँक ही सर्वसामान्याची आर्थिक वाहिनी असून या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करुन त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहू , अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे नूतन संचालक संग्राम देशमुख यांनी दिली. ते कडेपूर येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पदी निवड झाल्याबद्दल  आयोजीत कार्यक्रमात प्रसंगी बोलत होते. यावेळी कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगलताई क्षीरसागर यांच्या हस्ते संग्राम भाऊ देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

संग्राम देशमुख पुढे म्हणाले की, जिल्हा बँक ही जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असून सर्वसामान्यांचा आधार आहे. सुशिक्षित तरुणांनी बँकेचा अर्थसहाय्याने नवीन  उद्योगाची उभारणी करुन स्वावलंबी बनावे असे आवाहनही संग्राम देशमुख यांनी केले.यावेळी डोंगराई दूध संघाचे संचालक चंद्रकांत पाटील, धनाजी पवार , सिकंदर मुजावर, दत्तात्रय क्षीरसागर, प्रकाश मुळीक, जितेंद्र शिंदे, रवींद्र सूर्यवंशी, सुरेश गायकवाड, मोहन पवार, अल्लाउद्दीन मुजावर, अविनाश थोरात, संजय साठे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सांगलीत स्वाभिमानी विकास आघाडीला खिंडार; माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Abhijeet Shinde

सांगली : कर्मवीर पतसंस्थेकडून १३ टक्के लाभांश जाहीर

Abhijeet Shinde

गणेश मूर्तींचे कृत्रिम कुंडातच विसर्जन करा

Abhijeet Shinde

शिरोली-सांगली रस्ता नॅशनल हायवे ऍथॉरिटीकडे

Abhijeet Shinde

‘एस. टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव उधळून लावणार’

Abhijeet Shinde

सांगली : बहे परिसर कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन

Sumit Tambekar
error: Content is protected !!