तरुण भारत

पलूसच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न विधीमंडळात मांडणार : प्रविण दरेकर

पलूस / प्रतिनिधी

पलूसच्या विकासासाठी, स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठीची लागणारी सोयीच जागा पलूसकरांना मिळवून देण्यासाठीचा संवेदशील प्रश्न येणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशानात मांडणार असल्याचे मत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पलूस येथे व्यक्त केले.पलूस येथील नवीन बसस्थनका जवळील पाण्याच्या टाकीची जागा ही पाणी पुरवठा योजनेसाठी मिळावी यासाठी येथील सागर सुतार, रोहीत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोनल सुरू केले आहे. या आंदोलनास भेट देण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, पृथ्वीराज देशमुख आले होते. यावेळी ते बोलत होते.

दरेकर म्हणाले, पलूसच्या गायरान जमिनीची जागा सत्तेच्या जोरावर घेता येणार नाही. ही जागा पाण्याच्या योजनेसाठी त्वरीत द्यावी. पलूसचे मुख्याधिकारी यांनी शहराच्या विकासाठी काम करतो, आपण कुणाच्या घरचे नोकर नाही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही आहात हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे ही जागा पलूसकरांना दयावी लागेल अन्यथा यापेक्षा अधिक उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पलूसकरांसाठी जागा देणार नसला तर यापेक्षाही उग्र आंदोलन करावा लागलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू. पलूसच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही जागा तातडीने ताब्यात घेण्यासाठीचा प्रस्ताव करावा. निवडणूकीच्या तोंडावर आपण जनतेला स्वप्न दाखवायचं, निवडणूका झाल्या की, दिलेल्या वचनापासून दूर व्हायचं हे राजकारण या ठिकाणी योग्य नाही. महाराष्ट्र शासन, नगरविकास मंत्रालयांशी बोलून ही जागा पलूसकरांच्या विकासासाठी निश्चितपणे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, पलूसच्या विकासाचा प्रश्न आहे. ही जागा विकासासाठी मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये सर्वपक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावा.

Advertisements

Related Stories

सांगली : भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

सांगली : म्हैसाळ परिसरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठ अधिविभागांची पहिली प्रवेशफेरी बुधवारपासून

Abhijeet Shinde

सांगली : ‘बार चालू मंदिर बंद’ धोरण बंद करा

Abhijeet Shinde

सांगली : श्रीमंत अमरसिंह डफळे यांचे निधन

Abhijeet Shinde

मिरज शहरासह तालुक्याला वळीवाच्या पावसाने झोडपले, पूर्व भागात गारांचा पाऊस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!