तरुण भारत

भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला सर्वाधिक फायदा

जगभरातून परागवर कौतुकाचा वर्षाव – एलॉन मस्क यांचे उदगार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ट्विटरने मूळ भारतीय असणारे पराग अग्रवाल यांना आपला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या निवडीनंतर मात्र भारतासोबत जगभरातून पराग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे सोमवारी रात्रीपासून दिसून येत आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी पराग यांचे तेंडभरुन कौतूक करत भारतीय टॅलेंटचा अमेरिकेला सर्वाधिक फायदा झाला असल्याचेही म्हटले आहे.

परागाचे शिक्षण आयआयटी मुंबईतून, स्टॅनफोर्डमधून डॉक्टरेट

आयआयटी मुंबईतून शिक्षण घेणारे पराग अग्रवाल स्टॅनफोर्ड विद्यापीठातून डॉक्टर झाले आहेत. ट्विटरने 2018 मध्ये त्यांना ऍडम मेसिंजरच्या जागेवर मुख्य टेक्नॉलॉजी अधिकारी बनविले होते. ट्विटर अगोदर पराग हे मायक्रोसॉफ्ट संशोधक आणि याहू या कंपन्यांसोबत काम केले आहे.

भारतीयांचे आश्चर्यकारक यश- कोलिसन

पॅट्रिक कोलिसन यांनी पराग अग्रवाल यांना शुभेच्छा देताना, लिहले आहे, की ‘गुगल, मायक्रोसॉप्ट, अडोबी, आयबीएम, पालो आल्टो, नेटवर्क्स व आता ट्विटरचे सीईओपदी भारतीयांनी झेप घेतली आहे. टेकच्या दुनियेत भारतीयांची ही कामगिरी आश्चर्यकारक असून माझेकडून परागला शुभेच्छा’

तुमच्या कामगिरीवर गर्व- श्रेया घोषाल

गायक असणाऱया श्रेया घोषाल यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहीले आहे, की अभिनंदन पराग, तुझ्या कामगिरीवर गर्व असून हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे.

Related Stories

मार्चमध्ये टायटनची विक्री तेजीत

Patil_p

शेअर बाजारातील पाच दिवसांच्या तेजीला विराम

Patil_p

पेटीएम मनीच्या सीईओपदी वरूण श्रीधर

Patil_p

तिमाहीमध्ये सन फार्माचा नफा वधारला

Patil_p

राधे डेव्हलपर्सच्या समभागाने दिला उत्तम परतावा

Patil_p

उडान योजनेची गती मंदावली

Patil_p
error: Content is protected !!