तरुण भारत

सोलापूर : सावकारकी विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर : प्रतिनिधी

मुद्दल व व्याजाचे पैसे परत देऊनसुद्धा सावकाराकडून संजय लेंगरे यांच्याकडे तगादा लावण्यात येत होता. पैसे परत न मिळाल्यास जमीन विकून टाकणार असल्याचे सांगितल्याने सतीश तानाजी घंटे याच्याविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सतीश घंटे यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाखरी ता.पंढरपुर येथे संजय लेंगरे हे राहत असुन त्यांना वाखरी ता.पंढऱपुर येथे वडीलोपार्जीत शेती आहे. सन 2016 साली संजय लेंगरे यांनी इसबावी, पंढरपूर येथील सतिश तानाजी घंटे यांचेकडुन 5 लाख 45,000 रुपये रक्कम घेतली होती. त्याबदल्यात त्यांनी सतिश तानाजी घंटे यांना एक एकर वडीलोपार्जीत जमिनिपैकी 20 गुंठे जमिन लिहुन दिली होती. त्यावेळी सदर रक्कम परत केल्यानंतर जमिन परत देण्याचे ठरले होते.

त्याप्रमाणे संजय लेंगरे यांनी 23 जुलै 2018 रोजी सतिश तानाजी घंटे यांना 2 लाख रुपये परत केले होते. उर्वरीत रक्कम देखील परत करुनाही जमिन संजय लेंगरे यांच्या नावावर केली नाही. सतिश तानाजी घंटे यांनी संजय लेंगरे यांना तुमची मुद्दल व व्याज मिळुन वीस लाख रुपये होतात असे सांगीतले. संजय लेंगरे यांनी 7 लाख रुपये घे परंतू आमची जमिन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतू त्याने त्यास नकार दिला व विस लाख रुपयांची मागणी करु लागला. परंतु त्यावेळी सतिश घंटे याने घरी येवुन माझे विरुध्द तक्रार देवु नका तुमची जमिन मी तुम्हाला परत देतो असे बोलला होता. त्याप्रमामे वचनचिठ्ठी देखील लिहुन दिली.

काही दिवसानंतर संजय लेंगरे यांनी सतिश घंटे याला त्याला त्याची रक्कम परत करण्याची तयारी दाखवुन व जमिन पुन्हा नावावर करुन देण्यास सांगीतले. परंतु पुन्हा त्याने आपला शब्द फिरवुन नियमाप्रमाणे मुद्दल व व्याज मिळुन अशी वीस लाख रुपये दिल्याशिवाय जमिन देणार नाही असे सांगीतले. त्यामुळे संजय लेंगरे यांची पत्नी वैशाली संजय लेंगरे यांनी सतिश तानाजी घंटे याच्याविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील आरोपी सतिश तानाजी घंटे यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार हे करीत आहेत.

Advertisements

Related Stories

”हे” दांपत्य यंदा करणार विठूरायाची महापूजा

Abhijeet Shinde

माढा तालुक्यात दोन कोरोनाबाधितांची भर; बाधितांचा आकडा शंभरीपार

Abhijeet Shinde

एटीएम कार्डची अदलाबदल करून ९२ हजारांची फसवणूक

Abhijeet Shinde

सोलापुरात मंगळवारी १३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर

Abhijeet Shinde

सोलापूर : मराठवाडयाला जोडणारा तुळजापूर-उस्मानाबाद मार्ग बंद

Abhijeet Shinde

पुण्यात आज ‘बाळासाहेब ठाकरे महोत्सव’

prashant_c
error: Content is protected !!