तरुण भारत

अमिषा पटेल विरोधात वॉरंट

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या विरोधात भोपाळमधील एका न्यायालयाने जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. अमिषाच्या विरोधात एक धनादेश न वटल्याप्रकरणी खटला सुरू असून पुढील सुनावणीत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश तिला देण्यात आला आहे. अमिषाच्या विरोधात हे वॉरंट सोमवारी बजावण्यात आले आहे.

4 डिसेंबर रोजी अमिषा सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट बजावले जाऊ शकते. अमिषाच्या विरोधात इंदोर येथील एका न्यायालयात देखील धनादेश अन वटल्याप्रकरणी खटला  दाखल झाला आहे. तेथेही तिने चित्रपटाच्या नावावर 10 लाख रुपये घेतले होते. रक्कम परत करताना अमिषाकडून देण्यात आलेला धनादेश वटला नव्हता.

Advertisements

अमिषा मागील काही काळात कुठल्याच चित्रपटात दिसून आलेली नाही. तर स्वतःचा सुपरहिट चित्रपट ‘गदर’च्या सीक्वेलमध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि उत्कर्ष शर्मासोबत ती दिसून येण्याची शक्यत आहे. याचबरोबर अर्जुन रामपाल आणि डेजी शाह यांच्यासोबत अमिषा ‘मिस्ट्री ऑफ टॅटू’ या चित्रपटात काम करत असल्याचे समजते.

Related Stories

घटस्फोट घोषणेनंतर २४ तासाताच आमिर खान आणि किरण राव आले एकत्र …कसं ते वाचा सविस्तर

Abhijeet Shinde

फुलवा खामकर रमली आठवणींच्या खजिन्यात!

Patil_p

जीवनपटात श्रद्धाच्या जागी नुसरत भरुचा

Amit Kulkarni

रणवीरकडून 83 चे नवे पोस्टर शेअर

Patil_p

विद्या बालनसोबत दिसणार इलियाना डिक्रूज

Patil_p

निक जोनासला मिळाला डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!