तरुण भारत

दुर्मिळ ऊदमांजराचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

कासेगाव / प्रतिनिधी

भाटवाडी ता. वाळवा येथील भाटवाडी – काळमवाडी रस्त्यावर जोगीनिरा परिसरात रस्ताच्या कडेला असणाऱ्या गवतामध्ये एक विचित्र प्राणी निपचिप पडल्याचे रस्त्यावरून जाताना स्वाती डोंगरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत प्राणी मित्र गणेश निकम व सर्प मित्र मीनाक्षी निकम यांना कळवले. गणेश निकम यांनी याठिकाणी येऊन पाहिले असता ते दुर्मिळ जातीचे ऊदमांजर असल्याचे त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पलीकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ते मृत झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राणीमित्र गणेश निकम यांनी वनविभागाचे वनपाल सुरेश चरापले यांना याबाबत माहिती देऊन वनरक्षक दिपाली सागावकर यांच्या ताब्यात ऊदमांजर देण्यात आले.

या प्राण्याला मसन्या, उदला, कांडेचोर, काळमांजर असे देखील म्हणतात. हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. याचा रंग काळसर असून त्याच्या अंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या शरीराइतकीच त्याची शेपटी सुद्धा लांब असते. हा प्राणी फळे, मांस व किडे खातो. दिवसा हा प्राणी झाडाच्या फांदीवर किंवा ढोलीत झोपतो. रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. तसेच सायाळ व बिबट यासारखे निशाचर प्राणी देखील आपल्या भक्षा च्या शोधात फिरत असतात. भाटवाडी, काळमवाडी, केदारवाडी, वाटेगाव याभागात निशाचर प्राण्यांचा वावर जास्त असल्याने रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी रात्रीच्या वेळेस वाहने सावकाश व सावधपणे चालवावीत जेणेकरून असे प्रकार वारंवार होणार नाहीत. असे आवाहन प्राणी मित्र गणेश निकम व सर्प मित्र मीनाक्षी निकम यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

पनवर, अर्जुन बबुटा अंतिम फेरीसाठी पात्र

Patil_p

फेब्रुवारीमध्ये 38 हजार नागरिकांचा विमान प्रवास

Rohan_P

कर्नाटक: राज्य सरकारचा महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा विचार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मोहरेत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णावर अत्यसंस्कार, भय कमी करण्यासाठी प्रयत्न

Abhijeet Shinde

जग्वार लँड रोव्हरच्या वाहन विक्रीत वाढ

Patil_p

आर्यनची 26 दिवसांनी मन्नत पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!