तरुण भारत

राशिभविष्य

गुरुविण कोण दाखवील वाट भाग 2

पराशक्तीला गुरुंना आणि वाचकांना सविनय सादर नमस्कार. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे गुरु हा सगळय़ा शुभ गोष्टींचा कारक ग्रह आहे. गुरु हा धनाचा, विवाहाचा, संततीचा, भाग्याचा, लाभाचा कारक आहे. दाता आहे. धनू आणि मीन या राशींचा मालक आहे.

Advertisements

नुकताच गुरुने मकरेमधून कुंभेत प्रवेश केला आहे. या संक्रमण काळात अनेक लोकांना त्रास झाला असणार. शुभग्रह असून असे का हे नंतर सांगेनच. आता तुमच्या राशीवर या गुरु राशीबद्दलचा काय परिणाम होणार आहे हे पाहूया. हे परिणाम साधारण वर्षभर दिसतील.

मेष

हे वर्ष (गुरु बदलाचे!) तुमचेच आहे. आळस झटकून कामाला लागा. नवीन योजना आणि नवीन संधी तुमची वाट पहात आहेत. वाहन, घर घ्याल. विवाहितांना आनंदाचे दिवस. रोगांपासून सुटका. पदोन्नती आणि नोकरीच्या प्रयत्नात असलेल्यांचे आताच अभिनंदन.

वृषभ

कर्ज घेण्यापासून आणि देण्यापासून नुकसान होऊ शकते. कुटुंबात नवीन सदस्य येईल. धनप्राप्ती उत्तम. संततीकरता प्रयत्न करणाऱया जोडप्यांना गोड बातमी कळेल. पण व्यावसायिकदृष्टय़ा सावध राहण्याची गरज. दांपत्य जीवनात अशांती, आरोग्य सांभाळा.

मिथुन

अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्याची साथ राहील. लाभाचे दिवस आहेत. संधी साधून घ्या. वडिलांचा सल्ला आणि साथ यामुळे फायदा होईल. जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. धर्माबद्दल आस्था वाढेल. धार्मिक समारंभात सामील व्हाल.

कर्क

हा काळ सावध होण्याचा आहे. अचानक लाभ आणि अचानक हानी असा विचित्र संयोग आहे. जोडीदारांशी गैरसमज होऊ शकतो. नात्यामध्ये ताण येऊ शकतो. कुठल्याही पद्धतीची जोखीम टाळा. लाभाच्या संधी येता येता राहतील.

सिंह

सिंहेच्या लोकांना विशेषतः विवाहितांना सुगीचे दिवस. प्रेम, विश्वास वाढेल. जोडीदार हर कामात साथ देईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. आर्थिक आवक वाढेल. कामाचे ठिकाण मात्र बदलू नका. नवीन वस्तू खरेदी मात्र टाळावी लागेल.

कन्या

व्यावसायिकदृष्टय़ा थोडा कठीण काळ आहे. तब्येतही सांभाळावी लागेल. लाभाचे अवसर मिळतील पण तुमचे निर्णय चुकून ते हातून निसटण्याची शक्यता आहे. शक्मयतो या काळात नोकरीत बदल करू नका. हाडांच्या दुखण्यापासून सावध रहा.

पुढच्या लेखांमध्ये उर्वरित 6 राशींबद्दल पाहूया.

आपला आठवडा आनंदात जावो. जो जे वांछिल तो ते लाहो, शुभं भवतु

महाउपायः आजकाल प्रत्येक घरात कलह, मतभेद वाढले आहेत. यासाठी घराच्या नैऋत्य भागात पिवळय़ा रंगाच्या फ्लॉवर पॉटमध्ये पांढरी किंवा गुलाबी फुले ठेवावीत. करून बघा!

सोपा वास्तू उपायः नृत्यमग्न गणपती किंवा नटराज यांची मूर्ती ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चालेल, पण घरात नको!

मेष

व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा खूप चांगला जाणार आहे. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारीमुळे मात्र मन उदास होईल. या आठवडय़ात प्रयत्नांमध्ये मात्र कमी येऊ देऊ नका. हट्टी स्वभावाला आवर घाला. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. लेखन आणि वकिली करणाऱयांना उत्तम संधी. कामे पूर्ण करण्याकडे कल असू द्या.

उपाय/ उपासनाः शिव आराधना करा. शिवलिंगावर पाण्यात काळे तीळ घालून अभिषेक करा.

सावध रहा ः बुधवार, गुरुवार

शुभ अंक ः9, शुभरंग- लाल

वृषभ

तुमच्या व्यावहारिक चातुर्यामुळे समस्या सुटतील. पण उत्साह आणि ऊर्जेच्या स्तरातील कमीमुळे कामांचा वेग कमी राहील. या आठवडय़ात जमिनीबाबत काही व्यवहार असतील तर पूर्ण करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम. ऑनलाईन कोर्स करण्याचा मानस असेल तर जरुर करा. मनोरंजनाकडे कल राहील.

उपाय/ उपासनाः महालक्ष्मी अष्टकाचे क्षमतेनुसार पाठ करा.

सावध रहाः शुक्रवार, मंगळवार

शुभ अंकः 8, शुभ रंगः काळा.

मिथुन

 नोकरी व्यवसायातील समस्या सुटतील. महत्त्वाच्या कामामध्ये जीवनसाथीचा सल्ला मोलाचा ठरेल. तुमच्या हुशारीचा इतरांना फायदा होईल. अडकलेली सरकारी कामे होतील. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल. लाभाच्या संधी मिळतील. स्वास्थ्य उत्तम राहील.

उपाय/उपासनाः गाईला हिरवा चारा घाला.

सावध रहाः शनिवार, मंगळवार

शुभ अंकः 3, शुभ रंगः पिवळा

कर्क

अडचणी कमी होऊन मानसिक शांतीचा अनुभव कराल. नोकरदारांना तारेवरची कसरत करावी लागेल. प्रेमीजनांना घरच्यांची साथ मिळेल. अचानक लाभाचे योग. परदेशी जाण्याची इच्छा असेल तर जरुर प्रयत्न करावा. विवाहोत्सुकांना विवाहाचे प्रस्ताव मिळतील.

उपाय/उपासनाः शिवलीलामृताचा पाठ करावा.

सावध रहाः बुधवार, गुरुवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः पांढरा

सिंह

धाडसाचे कौतुक होईल. नवीन व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी मिळतील. आर्थिक तंगीतून सुटका मिळेल. तब्येत उत्तम राहील. नवे प्रेमसंबंध निर्माण होतील. दांपत्य जीवनात गोडवा येईल. सहलीची योजना आखाल. विद्यार्थ्यांना मात्र जास्त मेहनत करावी लागेल.

उपाय/उपासनाः मंगळवारी हनुमान मंदिरात शेंदूर अर्पण करा.

सावध रहाः गुरुवार, शनिवार

शुभ अंकः 3, शुभ रंगः आस्मानी

कन्या

सप्ताहाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सावध रहावे लागेल. करियर आणि नोकरीच्या संबंधित कुठलेही निर्णय घेताना सल्ला घेऊनच करा. असे कुठलेही निर्णय घेऊ नका ज्याने नंतर पश्चाताप होईल. शनिवार, रविवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीबद्दल चिंता वाटेल.  प्रेमसंबंध आणि दांपत्य जीवनात मधुरता येईल.

उपाय/ उपासनाः बुधवारी मूग दान करा

सावध रहाः शनिवार, रविवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः गुलाबी

तुळ

या आठवडय़ातील भाग्यवान रास, पाहुणे आल्यामुळे घरचे वातावरण खूप आनंदी राहील. मंगलकार्यात सहभागी व्हाल. वरि÷ आणि प्रभावशाली व्यक्तीमुळे नव्या संधी मिळतील. सगळय़ा प्रकारच्या लाभाचे योग. यात्रा योग आहे. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल.

उपाय/उपासनाः केळीचे झाड आणि धार्मिक पुस्तकांचे दान करा.

सावध रहाः गुरुवार, शुक्रवार

शुभ अंकः 9, शुभ रंग- पांढरा

वृश्चिक

समाजात मान वाढेल. व्यवसायात वृद्धी होईल. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील, अति उत्साहात काम बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. दांपत्य जीवनात गैरसमज होऊ शकतात. कोर्टकेसीस सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करा.

उपाय/ उपासनाः शनिवारी मारुतीला लाल वस्त्र अर्पण करा.

सावध रहाः मंगळवार, बुधवार

शुभ अंकः 3, शुभ रंगः हिरवा.

धनु

हा आठवडा स्वप्नपूर्तीचा आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. ऑफिस मधले सहकारी मदत करतील. मित्र मैत्रिणींसोबत मजा कराल. नोकरीमध्ये अचानक पदोन्नतीचे योग. शत्रू नरम पडतील. दांपत्य जीवनातील मधुरता कायम राहील.

उपाय/उपासनाः तांब्याचे कडे घाला. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा.

सावध रहाः मंगळवार

शुभ अंकः 1, शुभ रंगः लाल

मकर

आठवडय़ाच्या सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागेल. कौटुंबिक समस्यांमुळे मन खिन्न राहील. तुमच्या चिकाटीमुळे अवघड कामे होतील. भावाकडून साथ न मिळाल्याने उदास व्हाल. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. सबुरीने घ्या.

उपाय/उपासनाः व्यवसायात प्रगतीसाठी बुधवारी विष्णू मंदिरात पिवळय़ा फुलांचा हार अर्पण करा.

सावध रहाः रविवार

शुभ अंकः 5, शुभ रंगः हलका निळा.

कुंभ

वाढलेले खर्च आटोक्मयात येतील. संततीच्या बाबतीत शुभ समाचार कळेल. भाग्योदयाची सुरुवात आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील पण वरिष्ठामुळे मदत होईल. कौटुंबिक वाद संभवतात. प्रेम प्रकरणात तिसऱया क्यक्तीमुळे त्रास.

उपाय/उपासनाः देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा.

सावध रहाः शुक्रवार, शनिवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः पांढरा.

मीन

लाभांमध्ये वृद्धी, आठवडय़ाच्या सुरुवातीला मन प्रसन्न राहील. नोकरी व्यवसायात मनासारखी घटना घडेल. प्रेमसंबंधामध्ये असलेले गैरसमज दूर होतील. कुटुंबीयांसोबत हसत खेळत  वेळ घालवाल. मीन राशीला हा आठवडा उत्तम आहे.

उपाय/उपासनाः श्रीसुक्ताचे पाठ करा.

सावध रहाः रविवार

शुभ अंकः 9, शुभ रंगः आस्मानी

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.24 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 मार्च 2020

tarunbharat
error: Content is protected !!