तरुण भारत

गंभीर रुग्णांना ‘बूस्टर डोस’ शक्य

बालकांच्या लसीकरणावरही विचार, 2 आठवडय़ांमध्ये धोरण बनविणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाचे नवे ओमिक्रॉन रुप भारतातही शिरकाव करेल अशी शंका व्यक्ती केली जात असतानाच केंद्र सरकारने गंभीर कोरोना रुग्णांना बूस्टर डोस (लसीचा तिसरा डोस) देण्याचा गंभीरपणे विचार चालवला आहे. या संदर्भात राष्ट्रीय सल्लागार मंडळ येत्या दोन आठवडय़ांमध्ये धोरण तयार करणार आहे. याशिवाय, देशातील 44 कोटी बालकांचेही लसीकरण करण्याची योजना साकारत आहे.

विविध व्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ नागरीक आणि गंभीर रुग्णांना कोरोनापासून वाचविण्यासाठी अनेक देशांमध्ये बूस्टर डोस दिले जात आहेत. भारताही त्याच मार्गावर जाण्याचा विचार करीत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रालयने असे बूस्टर डोस दिले आहेत. भारतात येत्या दोन आठवडय़ांमध्ये केंद सरकारची सल्लागार समिती यासंबंधीचे धोरण ठरविणार आहे.  

दक्षतेचा उपाय

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन रुपाचा प्रसार वेगाने होत असल्याने दक्षतेची उपाययोजना म्हणून बूस्टर डोसकडे पाहिले जात आहे. भारतात असे 10 ते 12 कोटी लोक आहेत की ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर 30 कोटींहून अधिक लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे असे सरकारच्या सल्लागारांनी स्पष्ट केले आहे.

अद्याप ओमिक्रॉन नाही

अद्याप देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. कोरोनाच्या या रुपाचे उगमस्थान असणाऱया आफ्रिकेतील काही जण बेंगळूरमध्ये आहेत. त्यांच्यापैकी 2 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी एकजण डेल्टा संक्रमित असून दुसऱयाचा कोरोना डेल्टापेक्षा वेगळा असल्याने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसून सतर्कता बाळगण्यात येत आहे, अशी माहिती मांडविया यांनी पत्रकारांना दिली आहे.

संक्रमित नमुने पाठविण्याचा आदेश

अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. त्यामुळे भारतात अतिशय दक्षता बाळगण्यात येत असून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्या वाढविण्याचा आदेश देण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू आरटी-पीसीआर चाचणीला चकवा देऊ शकत नाही, असे आढळले असून ही दिलासादायक बाब आहे. सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी मूलभूत आरोग्य सेवा सज्ज ठेवाव्यात आणि संक्रमितांच्या रक्ताचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत असे आवाहनही केंद्र सरकारने केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

केंद्राच्या राज्यांना सूचना

ड धोक्याच्या छायेतील देशांच्या प्रवाशांची बारकाईने चाचणी करा. सर्व संक्रमित नमुने केंद्र सरकारच्या च्डतमअज्ग प्रयोगशाळांकडे त्वरीत पाठवा. संक्रमित रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा. 14 दिवस रुग्णाचा पाठपुरावा करा.

ड चाचणीच्या नियमांचे कठोर पालन करा. प्रत्येक जिल्हय़ात चाचणी सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करा. अधिक संख्येने रुग्ण असणाऱया भागांवर कसोशीने लक्ष ठेवा. त्यांची माहिती योग्यरित्या संकलित करा.

ड धोक्याच्या छायेतील देशांच्या ज्या प्रवाशांना होम क्वारंटाईनध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. अधिकाऱयांनी अशा जागांना व्यक्तीशः भेटी देऊन तपासणी करावी. संक्रमण नसलेल्यांची 8 व्या दिवशी चाचणी करा.

ड सर्व राज्यांनी पुरेशा प्रमाणात आयसीयु बेडस्, ऑक्सिजन बेडस्, व्हेंटिलेटर्स, औषधे यांची उपलब्धता सुनिश्चित करावी. राज्यांनी विमानतळ अधिकाऱयांच्या संपर्कात रहावे, ‘एअर सुविधा’ पोर्टलचा उपयोग करावा.

ड नव्या नियमांचे सुलभ पालन होण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी इमिग्रेशन, विमानतळ आरोग्याधिकारी, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱयांच्या संपर्कात रहावे. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती घ्यावी.

ड राज्य देखरेख अधिकाऱयांच्या माध्यमातून प्रतिदिन लक्ष ठेवावे. ज्या भागांमध्ये प्रसार अधिक आहे तेथे जास्त लक्ष ठेवावे. नव्याने आढळात आलेल्या पॉझिटिव्ह क्लस्टर्समध्ये अधिक दक्षता घ्यावी आणि सुविधा पुरवाव्यात.

Related Stories

मोदींकडे 3.07 कोटींची मालमत्ता

Patil_p

पीसी चाको यांचा काँग्रेसला ‘रामराम’

Patil_p

200 विशेष रेल्वे आजपासून धावणार

Patil_p

लवकरच येणार भारतीय ‘व्हॉट्सऍप’ रविशंकर प्रसाद यांनी केली घोषणा

Patil_p

साखर कारखान्यांना सीनएजी बायोगॅस प्रकल्प उभारण्यास केंद्राचा ग्रीन सिग्नल

datta jadhav

काँग्रेसच्या बैठकीत तृणमूल भाग घेणार

Patil_p
error: Content is protected !!