तरुण भारत

अझरबैजानमध्ये सैन्य हेलिकॉप्टर कोसळले

बाकू

अझरबैजानमध्ये मंगळवारी प्रशिक्षण उड्डाणादरम्यान एक सैन्य हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. सीमा रक्षक सेवा आणि अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका संयुक्त विधानानुसार सीमा रक्षक सेवेचे हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी गॅरेबात प्रशिक्षण मैदानावर उड्डाण करताना कोसळले आहे.

Advertisements

ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप समोर आलेले नाही. दोन शासकीय यंत्रणा या दुर्घटनेचा तपास करत आहेत. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव्ह आणि त्यांच्या पत्नी मेखरिबान अलीयेवा यांनी मृतांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Related Stories

शेतकरी आंदोलन स्थगित

datta jadhav

दिल्लीत कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 5.70 लाखांचा टप्पा

Rohan_P

बिहार : तीन महिलांना डायन म्हणत जमावाकडून मारहाण, विवस्त्र करून काढली धिंड

Rohan_P

मध्य प्रदेश : या जिल्ह्यातील नागरिकांनी लावला ‘सेल्फ लॉकडाऊन’

Rohan_P

घाऊक महागाईचा आठ वर्षातील उच्चांक

Amit Kulkarni

भारताने सीमारेषेवर तैनात केल्या होवित्झर तोफा

datta jadhav
error: Content is protected !!