तरुण भारत

पाकचा बांगलादेशवर 8 गडय़ांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ चितगाँग

पाकिस्तान क्रिकेट संघाने मंगळवारी येथे पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान बांगलादेशचा आठ गडय़ांनी दणदणीत पराभव करून दोन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी ढाका येथे 4 ते 8 डिसेंबर दरम्यान खेळविली जाईल.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या डावात 330 धावा जमविल्यानंतर पाकने पहिल्या डावात 286 धावा केल्या. बांगलादेशने 44 धावांची आघाडी पहिल्या डावात मिळविली. दरम्यान शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा दुसरा डाव 156 धावात आटोपला. पाकला निर्णायक विजयासाठी 201 धावांची जरुरी होती. या कसोटीतील सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर पाकने आपल्या दुसऱया डावाला दमदार सुरुवात करून देताना बिनबाद 109 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून त्याने मंगळवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि उपाहारापूर्वीच पाकने 2 बाद 203 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. पाकची सलामीची जोडी आबिद अली आणि अब्दुल्ला शफीक यांनी 42.5 षटकात 151 धावांची भागीदारी केली. बांगलादेशचा गोलंदाज मेहदी हसनने अब्दुल्ला शफीकला पायचीत केले. त्याने 129 चेंडूत 8 चौकारासह 73 धावा जमविल्या. ताजुल इस्लामने आबिद अलीला पायचीत केले. त्याने 148 चेंडूत 12 चौकारांसह 91 धावांचे योगदान दिले. आबिद अलीचे शतक 9 धवांनी हुकले. अझहर अली आणि कर्णधार बाबर आझम यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. आबिद अली पाच चौकारासह 24 धावावर तर बाबर आझम 3 चौकारासह 13 धावावर नाबाद राहिले. पाकने 58.3 षटकात 2 बाद 303 धावा जमवित विजय नोंदवला. बांगलादेशतर्फे ताजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या कसोटीत पाकचे गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हसन अली प्रभावी ठरले. बांगलादेशच्या पहिल्या डावात हसन अलीने 51 धावात 5 तर दुसऱया डावात शाहीद आफ्रिदीने 32 धावात 5 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत बांगलादेशला एकही सामन्यात पाकला पराभूत करता आलेले नाही.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प. डाव सर्वबाद 330, पाक प. डाव सर्वबाद 286, बांगलादेश दु. डाव सर्वबाद 157, पाक दु. डाव 58.3 षटकात 2 बाद 203 (आबिद अली 91, अब्दुल्ला शफीक 73, अझहर अली नाबाद 24, बाबर आझम नाबाद 13 टी. इस्लाम 1-89, मेहदी हसन 1-59).

Related Stories

मिराबाई चानू भारताची एकमेव वेटलिफ्टर

Patil_p

सचिन, लाराने लुटला गोल्फचा आस्वाद

Patil_p

आयसीसी बहुमानासाठी अश्विन, रूट, मायर्सला नामांकन

Patil_p

भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत आज

Patil_p

बलाढय़ ऑस्ट्रेलियाची द. आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी

Patil_p

विल्यम्सन, टेलर यांची शानदार अर्धशतके

Patil_p
error: Content is protected !!