तरुण भारत

बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्ससाठी भारतीय स्पर्धक सज्ज

वृत्तसंस्था/ बाली

इंडोनेशियात बुधवारपासून विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2021 च्या बॅडमिंटन हंगामातील विश्व टूर फायनल्स स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी पी. व्ही. सिंधू, सात्विकसाईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी त्याचप्रमाणे लक्ष्य सेन हे भारतीय बॅडमिंटनपटू सज्ज झाले आहेत.

Advertisements

दीड लाख डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या बॅडमिंटन स्पर्धेसाठी पी. व्ही. सिंधूने जोरदार सराव केला आहे. या स्पर्धेत महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी हे पुरुष दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्कीरेड्डी हे महिला दुहेरीत खेळणार आहेत. विद्यमान विश्वविजेती पी. व्ही. सिंधूने 2018 साली या स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविले होते. प्रत्येक वर्षीच्या बॅडमिंटन हंगामाअखेरीस ही स्पर्धा विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे घेतली जाते.

या स्पर्धेत अ गटात सिंधूचा समावेश करण्यात आला आहे. तिचा सलामीचा सामना थायलंडच्या टॉप सिडेड पी. चोचूवांग बरोबर होणार आहे. 2014 साली या स्पर्धेत भारताच्या श्रीकांतने बाद फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी पुरुष एकेरीत श्रीकांतचा सलामीचा सामना ब गटातील मलेशियाच्या जियाशी होणार आहे. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांना दुहेरीत इंडोनेशियाच्या गिडॉन आणि सुकामुलिजो यांच्याशी सलामीच्या सामन्यात लढत द्यावी लागेल. महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्कीरेड्डी यांचा सलामीचा सामना जपानच्या मात्सुयामा आणि शिदा या द्वितीय मानांकित जोडीशी होणार आहे.

Related Stories

टी-20 मानांकनात भारत दुसऱया स्थानी

Patil_p

ओसाकाचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद

Patil_p

ऑलिम्पिक पात्रता बॅडमिंटन कालावधीत वाढ

Patil_p

हैदराबाद एफसी-बेंगलोर एफसी लढत गोलशून्य बरोबरीत

Patil_p

बिग बॅश लीगचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

सुमित मलिकचे ऑलिम्पिक तिकीट निश्चित

Patil_p
error: Content is protected !!