तरुण भारत

लंकेचा पहिला डाव 204 धावात समाप्त, पेरुमलचे 5 बळी

वृत्तसंस्था/ गॅले

येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत मंगळवारी विंडीजने यजमान लंकेला पहिल्या डावात 204 धावावर रोखले. त्यानंतर विंडीजने दिसवअखेर पहिल्या डावात 1 बाद 69 धावा जमविल्या. विंडीज संघातील फिरकी गोलंदाज वीरसामी पेरुमलने 35 धावात 5 गडी तर वेरीकनने 50 धावात 4 गडी बाद केले.

Advertisements

या कसोटीत पावसाळी हवामानाचा अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला. खेळाच्या पहिल्या दिवशी लंकेने बिनबाद 113 धावा जमविल्या होत्या. लंकेने बिनबाद 113 या धावसंख्येनवरून मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे सर्व म्हणजे 10 फलंदाज 91 धावात तंबुत परतले. लंकेच्या  सलामीच्या निसांकाने 5 चौकारासह 73, कर्णधार करुणारत्नेने 6 चौकारासह 42, मॅथ्यूजने 2 चौकारासह 29, ओशादा फर्नांडोने 2 चौकारासह 18, लकमलने 2 चौकारासह 12 धावा जमविल्या. पेरुमल आणि वेरीकन यांच्या फिरकी माऱयासमोर लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. निसांका आणि करुणारत्ने यांनी सलामीच्या गडय़ासाठी 106 धावांची भागीदारी केली. मात्र या भक्कम सलामीचा नंतरच्या फलंदाजांना लाभ उठविता आला नाही.

लंकेचा पहिला डाव 204 धावात आटोपल्यानंतर विंडीजने दुसऱया दिवसाअखेर 31.4 षटकात पहिल्या डावात 1 बाद 69 धावा जमविल्या. कर्णधार ब्रेथवेट आणि ब्लॅकवुड या सलामीच्या जोडीने लंकेच्या फिरकी माऱयाला समर्थपणे तेंड देताना 62 धावांची भागीदारी केली. जयविक्रमाने ब्लॅकवुडला पायचित करीत ही जोडी फोडली. त्याने 5 चौकारासह 44 धावा केल्या. पाऊस व अंधुक प्रकाश यामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला त्यावेळी कर्णधार ब्रेथवेट 1 चौकारासह 22 तर बॉनेर 1 धावेवर खेळत होते. लंकेतर्फे जयविक्रमाने 11 धावात 1 बळी मिळविला. 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत लंकेने पहिली कसोटी जिंकून विंडीजवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. विंडीजला ही मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव 61,3 षटकात सर्वबाद 204 (निसांका 73, करुणारत्ने 42, ओशादा फर्नांडो 18, मॅथ्यूज 29, असालंका 10, लकमल 12, पेरुमल 5-35 वेरीकन 4-50, चेस 1-64), विंडीज प. डाव 29.4 षटकात 1 बाद 69 (बेथवेट खेळत आहे 22, बॉनेर खेळत आहे 1, ब्लॅकवुड 44, जयविक्रमा 1-11 ).

Related Stories

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री मदतनिधी

Patil_p

बेन स्टोक्सचा डरहॅमशी आणखी 3 वर्षांचा करार

Patil_p

सुसज्ज ‘मोटेरा’वर आजपासून ऐतिहासिक कसोटी

Patil_p

जोश्ना चिन्नप्पा उपांत्यपूर्व फेरीत

Omkar B

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर शिक्कामोर्तब

Patil_p

भारतीय महिला फुटबॉल संघाचा ब्राझीलविरुद्ध सामना

Patil_p
error: Content is protected !!