तरुण भारत

विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या चार जणांची निवड

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

2023 साली होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या चार जणांची अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. सदर स्पर्धा भुवनेश्वर आणि रुरकेला येथे खेळविली जाणार आहे.

Advertisements

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने भारताच्या सोनिया बाथलाची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्याचप्रमाणे निवृत्त कर्नल डॉ. बिभू कल्याण नायक यांची वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे रघुप्रसाद व जावेद शेख यांची पंच म्हणून निवड केली आहे. दिल्ली हॉकी संघटनेच्या सोनिया बाथला या एकमेव महिला व्यक्तिची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने या आगामी स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे.

निवृत्त कर्नल डॉ. बिभू कल्याण नायक हे क्रीडा क्षेत्रातील ट्रॉमाटोलॉजी आणि एक्सरसाईज फिजिओलॉजी विभागातील तज्ञ व्यक्ती म्हणून ओळखले जातात. नायक यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या आरोग्य व सुरक्षा समिती चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली होती. रघुप्रसाद आणि जावेद शेख हे आगामी पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत पंचगिरी करणार आहेत. गेल्या जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जावेद शेख यांनी पंचगिरी केली होती. गेल्या जवळपास 10 वर्षांच्या कालावधीत जावेद शेख यांनी राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा तसेच 2014 सालातील पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत पंच म्हणून कार्यरत होते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जावेद शेख हॉकीचे पंच म्हणून निवडले गेले होते. रघुप्रसाद हे अनुभवी हॉकी पंच म्हणून ओळखले जातात. गेल्या 16 वर्षांच्या कालावधीत रघुप्रसाद यांनी राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा तसेच टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धा आणि तीन विश्व चषक हॉकी स्पर्धांमध्ये पंचगिरी केली होती.

क्लुसनर अफगाणचे प्रशिक्षकपद सोडणार

Related Stories

एएफसी चॅम्पियन्स लिग स्पर्धेचे यजमानपद मलेशियाला

Patil_p

जर्मनी दौऱयासाठी भारतीय महिला हॉकी संघ सज्ज

Patil_p

भारतीय तिरंदाजांना सुवर्णपदकाची पुन्हा हुलकावणी

Patil_p

क्रीडा वर्तुळातून मदतीचा ओघ कायम

Patil_p

संजिता चानूला मिळणार अर्जुन पुरस्कार

Patil_p

बुधगावच्या दोन दिव्यांग खेळाडूंनी सर केलं कळसुबाई शिखर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!