तरुण भारत

क्लुसनर अफगाणचे प्रशिक्षकपद सोडणार

वृत्तसंस्था/ काबूल

दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू लान्स क्लुसनर यांच्याकडे अफगाण क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी सोपविण्यात आली होती. अफगाण क्रिकेट मंडळ आणि क्लुसनर यांच्यातील झालेल्या कराराची मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे.

Advertisements

गेल्या दोन वर्षांपासून क्लुसनर अफगाण क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. अफगाण क्रिकेटच्या संघाला त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. क्लुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाण क्रिकेट संघाने एक कसोटी, तीन वनडे आणि 9 टी-20 सामने जिंकले आहेत. प्रशिक्षकपदाच्या कराराचे नुतनीकरण करण्याची आपली इच्छा नसल्याचे क्लुसनर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 1996 ते 2004 या कालावधीत क्लुसनर यांनी 49 कसोटी आणि 171 वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

पीव्ही सिंधू दुसऱया फेरीत

Patil_p

अर्जुन पुरस्कारासाठी रशीद, अदिती, दिक्षाची शिफारस

Patil_p

जलतरणात महाराष्ट्राला आणखी तीन सुवर्णपदके

Patil_p

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रोनाल्डोचे सर्वाधिक गोल

Amit Kulkarni

आरसीबीच्या पदरी अपयशाचा ‘वनवास’!

Patil_p

आयपीएल रुपरेषेची आज घोषणा : गांगुली

Patil_p
error: Content is protected !!