तरुण भारत

डेव्हिस चषक -क्रोएशिया उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ तुरिन, इटली

येथे झालेल्या डेव्हिस चषक उपांत्यपूर्व लढतीत क्रोएशियाने इटलीचा धक्कादायक पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. दुहेरीच्या निर्णायक लढतीत ऑलिम्पिक चॅम्पियन्स निकोला मेक्टिक व मेट पॅविच यांनी यानिक सिनर व फॅबिओ फॉगनिनी यांच्यावर मात करीत क्रोएशियाला हे यश मिळवून दिले.

Advertisements

इटलीला या स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यापैकी एक मानले जात होते. पण पहिल्या एकेरीत लॉरेन्झो सोनेगोचा बोर्ना गोजोकडून झालेला धक्कादायक पराभव त्यांना खूपच महाग पडला. दुसऱया एकेरीत सिनरने मारिन सिलिकवर विजय मिळवित क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे दुहेरीला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले. त्यात मेक्टिक-पॅविच जोडीने सिनर व फॉगनिनी यांच्यावर 6-3, 6-4 अशा सेट्सने मात करीत आपल्या संघाला शेवटच्या चारमध्ये स्थान मिळवून दिले.

Related Stories

व्हेरेव्ह, बुस्टा, ब्रॅडी, ओसाका उपांत्य फेरीत

Patil_p

पदार्पणवीर नामिबियाचा स्कॉटलंडविरुद्ध लक्षवेधी विजय

Patil_p

सेरेनाकडून व्हिनस पराभूत

Patil_p

टाटा ओपन स्पर्धेत दुहेरीत लिअँडर पेस, मॅथ्यू एबडन यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Patil_p

महाराष्ट्राच्या 21 व्या कबड्डी दिनाचा कौतुक सोहळा रद्द!

Patil_p

ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p
error: Content is protected !!