तरुण भारत

शकीब हसनचे पुनरागमन

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन आता पूर्ण फिट झाला असून पाकिस्तानविरुद्ध होणाऱया दुसऱया कसोटीसाठी त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.

Advertisements

गेल्या महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत विंडीजविरुद्धच्या सामन्यावेळी त्याला धोंडशिरेची दुखापत झाली होती. त्यामुळे ती स्पर्धा आणि नंतर नोव्हेंबरमध्ये पाकविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांची टी-20 मालिकाही त्याला हुकली होती. पहिल्या कसोटीसाठीही त्याची निवड करण्यात आली होती. पण अंतिम निवडीवेळी त्याला अनफिट ठरविण्यात आले. त्याच्या गैरहजेरीत तैजुल इस्लामने आपल्या फिरकीवर 116 धावांत 7 बळी मिळविल्याने बांगलादेशला पाकवर पहिल्या डावात आघाडी मिळाली होती. पाकने हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. 4-8 डिसेंबरपर्यंत होणाऱया दुसऱया कसोटीत बांगलादेशने वेगवान गोलंदाज तस्किन अहमदलाही संघात स्थान दिले आहे. बोटाच्या दुखापतीमुळे त्यालाही पहिली कसोटी हुकली होती.

Related Stories

मॅकडोनाल्ड-सिनेर यांच्यात अंतिम लढत

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये सिंहराज अधानाला कांस्यपदक

datta jadhav

क्विटोव्हा, थिएम, सीगमंड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

प्लिस्कोव्हा पराभूत, क्विटोव्हा, जोकोविचची आगेकूच

Patil_p

नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन पाचव्यांदा विश्वविजेता

Patil_p

केकेआरचा हैदराबादविरुद्ध सफाईदार विजय

Patil_p
error: Content is protected !!