तरुण भारत

सानिया मिर्झा बेंगळूर स्पार्टन्सची ब्रँड ऍम्बॅसेडर

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा टेनिस प्रिमियर लीगमध्ये बेंगळूर स्पार्टन्सची ब्रँड ऍम्बॅसेडर म्हणून सामील झाली आहे. ही स्पर्धा 13 डिसेंबरपासून मुंबईत खेळविली जाणार आहे.

Advertisements

‘टेनिस प्रिमियर लीगशी निगडित होता आले, याचा मला आनंद आहे. बेंगळूर स्पार्टन्स या माझ्या संघाला माझा पूर्ण पाठिंबा व मार्गदर्शन असेल. या स्पर्धेसाठी 20 गुणांचा फॉरमॅट वापरण्यात आला आहे, त्याने मी जास्त आकर्षित झाले आहे. यामुळे टेनिस हा सांघिक व मनोरंजक खेळ बनला आहे. टेनिसच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी मी नेहमीच पुढे असते आणि सध्या त्याची गरजही आहे,’ असे सानिया म्हणाली. टीपीएलचा हा तिसरा मोसम असून त्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

Related Stories

नोव्हॅक जोकोविच, अलेक्झांडर व्हेरेव्ह, अँडी मरे तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

भारत-चिली महिला हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

रोश, डॉरिच दुसऱया कसोटीतून बाहेर

Patil_p

इंग्लंडचे द. आफ्रिकेला 259 धावांचे आव्हान

Patil_p

गोल्फपटू टायगर वूडस कार अपघातात गंभीर जखमी

Patil_p

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाचे ‘हार्ड क्वारंटाईन’

Patil_p
error: Content is protected !!