तरुण भारत

बिबटय़ाचा हल्यात 7 शेळ्या 1 गाई 1 खोंड ठार

प्रतिनिधी/ वाई

 वाई वनविभागाच्या बेजबाबदार  अधिकार्या मुळे आणी दररोजच्या  गलथान कारभाराने कळस गाठल्याने निसर्गाने नटलेल्या  वाईच्या पश्चिम भागातील  डोंगर दर्यां खोर्यातील  रागांच्या कुशीत वसलेल्या वासोळे गावावर  गेल्या चार दिवसा पासून बिबटय़ाने हल्ला चढवून तेथील  रहिवासी असलेले शंकर कृष्णा कोंढाळकर यांच्या प्रत्येकी  7 हजार रुपये किंमत असलेल्या तब्बल 7 शेळ्या .(2) सिताराम रामचंद्र सपकाळ यांची 10 हजार रुपये किमतीची 1 गाई आणी संजय महादेव सपकाळ यांचा 15 हजार रुपये किमतीचा 1 खोंड हि जनावरे वासोळे गावच्या हद्दीतील दुधाईचा डोंगर आणी माडगणी डोंगर परिसरात 

Advertisements

सकाळी चरण्यासाठी गेली होती ती परत रात्री घरी न परतल्याने जनावरांच्या मालकांनी वासोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते असणारे बाजीराव नाना यांची भेट घेऊन जनावरे बेपत्ता 

असल्याची माहिती दिली .

बाजीराव नाना यांनी सर्वांना सोबत घेऊन बेपत्ता जनावरांचा दि.30 रोजी सकाळ पासून 

शोध मोहीम सुरू केली त्या वेळी बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात गाई शेळी आणी खोंड जिवंत 

ठार करुन सर्व मॉंस खाऊन टाकुन फक्त हाडांचे सांगाडे सापडल्या मुळे शेतकर्यांच्या आश्रूंचे बांध फुटले .वाईच्या पश्चिम भाग हा  

बारमाही दुष्काळ ग्रस्त म्हणुन ओळखला जातो त्या मुळे घर प्रपंच चालविणे अवघड असल्याने येथील घरटी पुरुष वर्ग हा नोकरी निमित्त पुणे मुंबई गुजरात अशा शहरांन मध्ये गेल्या मुळे 

येथील महिला वर्ग हा शेळी गाई म्हैस पाळुन त्या पासून शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करत असतात त्यातुन येणार्या पैशातून येथील महिला वर्ग मुलांच्या शैक्षणिक 

खर्च व शेतीसाठी बि बियाने रासायनीक खाते 

व प्रापंचिक खर्चा साठी वापरतात पण याच दुपत्या जनावरांन वर बिबटय़ाने हल्ला चढवून वासोळे गावातील पशुधन नष्ट करण्याचा सुरु केलेल्या प्रयत्ना मुळे येथील शेतकरी हवालदील झाला आहे .

वाई वनविभागाला जबाबदार अधिकार्यांची 

नेमणुक नसल्याने या विभागात बेजबाबदार 

पणाचा कळस गाठला आहे गेल्या दोन महिन्यां पासून वाई तालुक्यातील पुर्व आणी पश्चिम भागातील डोंगर पायथ्याशी असणार्या गावांन

मध्ये बिबटय़ाचा मुक्त संचार सुरू असुन त्याने अनेक शेतकर्राच्या शेळ्या आणी कुत्री ठार केल्याची नोंद वाई वनविभागात होऊन देखील 

येथील अधिकार्याने हा बिबटय़ा जेरबंद करण्या

साठी कुठल्याच उपाय योजना केल्या नसल्याने 

वाई तालुक्यातील शेतकर्यांन मध्ये वन विभागाच्या या गलथान कारभारा विषयी संतापाची लाट उसळली आहे .वाई वनविभागाच्य या गलथान कारभारा मुळे प्रत्येक शेतकर्यांना दिली जाणारी लाखो रुपयांची मदत हा शासनाला नाहक भुर्दड बसत आहे याची जाणीव ठेवून आणी माणसांचे मुडदे  पडण्या आधी वाई  वनविभागाच्या 

वरिष्ठ अधिकार्यांनी वाई वनविभागा साठी जबाबदारीची जाणीव असणार्या सक्षम अधिकार्यांची नेमणूक करावी अशी मागणी वाई 

तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे ..

Related Stories

साताऱयात वाढू लागली गुन्हेगारी

Patil_p

धमकी देऊ नका.. एकच थापड देऊ, पुन्हा कधीच उठणार नाही

Abhijeet Shinde

”देशाला मृत्यूच्या खाईत लोटनाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा”

Abhijeet Shinde

वाळवा तालुक्यात एका दिवसात १८ जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

अपहरण झालेल्या युवकाची सहा तासात सुटका

Patil_p

कचऱयाचे फोटो सोशल मीडियावर अन् दंड झाला ठेकेदाराला

Patil_p
error: Content is protected !!