तरुण भारत

नगरपालिकेच्या तिजोरीवर 34 हजार कोटींचा बोजा

वार्ताहर / शाहूपुरी

एकूण 44 कोटी थकबाकीपैकी सुमारे दहा कोटी रुपये वसूल करण्यात सातारा पालिकेस आत्तापर्यंत यश आले आहे. प्रयत्न करूनही वसुलीचा वेग वाढत नसल्याने पालिकेच्या तिजोरीवर ताण आला असून, त्याचा परिणाम सातारा शहरातील विकासकामांसह प्रशासकीय बाबींवर होत आहे. येत्या चार महिन्यांत उर्वरित 34 कोटींची थकबाकी वसूल करण्याचे शिवधनुष्य पालिकेस उचलावे लागणार आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे जुनी वसुली करताना आव्हान ठरत आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी येणाऱया निधी बरोबरच मालमत्ता व इतर सुविधांपोटी नागरीकांकडून आकारणात येणारा कर पालिकेच्या उत्पन्नाचा हमखास स्त्राsत आहे. कर रूपातून तिजोरीत सातारा नगरपालिकेतून जमा होणाऱया उत्पन्नातून पालिकेचा नियमित खर्च तसेच इतर उपाययोजनांवर अवलंबून असतो. कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे सातारा पालिकेची वसुली रखडली गेली आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पालिकेने वसुलीवर जोर दिला. मात्र, त्यात म्हणावे इतके यश आले नाही.

Advertisements

सातारा पालिकेस शहरातील विविध मिळकत धारकांकडून जुन्यातील 30 कोटी तर चालू वर्षातील 14 कोटी रुपये येणे बाकी आहे. प्रलंबित वसुली जास्त असल्याने ती प्राधान्याने वसूल करण्यावर वसुली विभागाने जोर दिला. मात्र, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. सद्यःस्थितीत जुन्यातील 30 कोटींपैकी फक्त चार कोटी 50 रुपयेच वसूल झाले असून, त्याचे प्रमाण फक्त 15 टक्के इतके आहे. येत्या चार महिन्यांत पालिकेच्या वसुली विभागास जुन्यातील 25 कोटी 50 रुपये वसूल करावे लागणार आहेत. जुनी थकबाकी वसूल करतानाच पालिकेने चालू वर्षातील 14 कोटी रुपयांच्या वसुलीवरही जोर दिला होता. यामुळे पालिकेस चालू थकबाकीपैकी पाच कोटी 50 लाख रुपये वसूल करता आले आहेत. अद्यापही चालू वर्षातील नऊ कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी वसुलीसाठी पालिकेस आगामी काळात जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. एकूण या 44 कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी दहा कोटी रुपये आत्तापर्यंत

वसूल झाले असून, त्याचा आढावा नुकताच पालिका प्रशासनाने घेतला. आढावा घेतानाच वसुली विभागास धारेवर धरत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यासाठीचे आदेश पालिका प्रशासनाने संबंधितांना दिले आहेत.   

येत्या काही दिवसांत वसुलीचे प्रमाण वाढविण्यावर जोर राहणार असून, त्यासाठी जादा पथके तैनात करण्यात येणार आहेत. नागरिकांना थकबाकी भरण्याच्या नोटिसा पाठविण्यात येत आहेत. नागरिकांनी नोटिसा मिळाल्यानंतर थकबाकी भरून पालिकेस सहकार्य करणे आवश्यक आहे.

Related Stories

नवीन वाहतूक दंडातून ऍटो रिक्षांना वगळा

Patil_p

‘सत्ता ब’ मधुन पाच कोटीचा महसुल जमा

Patil_p

किरकोळ कारणावरून दोन जणांना लाकडी दांडक्याने मारहाण

Abhijeet Shinde

रेमेडीसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

Patil_p

ग्रामपंचायतीचे 54 कर्मचारी पालिकेकडे होणार वर्ग

Patil_p

भोसरेत वार्षिक दिपोत्सव व शिवप्रताप दिन साजरा

Patil_p
error: Content is protected !!