तरुण भारत

मच्छे येथे 12 रोजी मॅरेथॉन स्पर्धा

वार्ताहर /किणये

मच्छे येथील फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजनगर, वाघवडे रोड, मच्छे येथे होणार आहेत.

Advertisements

मुलांसाठी दोन गटात व मुलींसाठी एका गटात या मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत.

मुलांसाठी खुला गट : यामध्ये 12 कि.मी. अंतर असून पहिले बक्षीस 4000 रु., दुसरे 2800, तिसरे 1800 रु, चौथे 1000, पाचवे 700 रुपये.

गावमर्यादित मुलांसाठी खुला गट

अनुक्रमे 2000 रु., 1500 व 1000 रु. अशी तीन बक्षिसे आहेत.

मुलांसाठी (16 वर्षाखालील) गट

याचे अंतर 7 कि.मी. आहे. या स्पर्धेत अनुक्रमे 3000 रु. 1800 रु., 1200 रु, 800 रु, 500 रु. अशी पाच बक्षिसे आहेत.

गाव मर्यादित L अनुक्रमे 1500 रु. 1000 रु., 700 रु. अशी तीन बक्षिसे आहेत.

मुलींसाठी खुला गट (13 वर्षावरील) : याचे अंतर 7 कि.मी. असून बक्षिसे अनुक्रमे 4000 रु., 2800 रु., 1800 रु., 1000 रु., 700 रु. अशी पाच बक्षिसे आहेत.

गाव मर्यादित मुलींसाठी

पहिले बक्षीस 2000 रु., दुसरे 1500 रु., तिसरे 1000 रु. अशी तीन बक्षिसे आहेत.

स्पर्धकांनी आपली नावे 11 डिसेंबरपर्यंत नोंद करावीत व अधिकाधिक खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 8088910500 येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

कुवेतमधील 8 लाख भारतीय संकटात

Patil_p

रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज सुरूच

Amit Kulkarni

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैभवी दळवीला यश

Amit Kulkarni

बुलकमध्ये पुस्तक परिचय

Patil_p

जांबोटीत सोमवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊन

Amit Kulkarni
error: Content is protected !!