तरुण भारत

बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, अमृत पोतदार सीसीआय संघांचे विजय

केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 7 गडय़ांनी तर दुसऱया सामन्यात अमृत पोतदार सीसीए संघाने एसडीएमसीए ब संघाचा 220 धावानी पराभव केला. स्वप्निल एळवे (अमृत पोतदार), अमर घाळी (बेळगाव स्पोर्ट्स क्लब) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

हुबळी येथे केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाने 35.5 षटकात सर्व बाद 130 धावा केल्या. निखील दोडमनीने 33, नवीन संकपालने 22, सतिश नायरने 15, सुबल हावेरीने 14, साई बजंत्री व अभिषेक मादार यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अमर घाळीने 19 धावात 5, पार्थ पाटीलने 19 धावात 2, स्वयं अप्पण्णावरने 18 धावात 2, ओमकार वेर्णेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 13.1 षटकात 3 बाद 131 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला. आकाश कटांबळेने 6 षटकार, 5 चौकारासह नाबाद 65, शिवम नेसरीकरने नाबाद 34, सुदीप सातेरीने 18 धावा केल्या. हुबळीतर्फे सतिश नायरने 49 धावात 2, सुप्रित कुलकर्णीने 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात अमृत पोतदार सीसीआय संघाने 46.3 षटकात सर्व बाद 406 धावांचा डोंगर रचला. सलामीवीर स्वप्निल एळवेने 6 षटकार व 14 चौकारासह 116 धावा करून शतक झळकविले. तुषार सिंगने 5 षटकार, 1 चौकारासह 94, अमन खानने 2 षटकार, 7 चौकारासह 52, वैभव कुरीबागीने 2 षटकार, 2 चौकारासह 33, शिवप्रसाद हिरेमठने 29, सुशांत कोवाडकरने नाबाद 25, झीनत एबीएमने 24 धावा केल्या. एसडीएमतर्फे सुनिल कुरीने 67 धावात 4, हबीब ताडपत्रीने 7 धावात 2, आदर्श हिरेमठ, विनय हिरेमठ, कासिम अली, अब्दुल कासीम डी. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएमसीए ब संघाचा डाव 43.3 षटकात सर्व बाद 186 धावात आटोपला. हबीब ताडपत्रीने 48, मॅथ्यू नेवूलगलने 27, सुनिल कुरीने 31, अब्दुल कासीमने 17 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीआयतर्फे झीनत एबीएमने 36 धावात 3, सुशांत कोवाडकरने 40 धावात 3, अमन खानेने 31 धावात 2, वैभव कुरीबागीने 1 गडी बाद केला.

Related Stories

‘त्या’बुडालेल्या दोन सख्ख्या बहिणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

बेळगाव शहर विभागातून 15 शिक्षक उमेदवारांचे अर्ज मागे

Patil_p

कोरोनाग्रस्त आरोपीमुळे कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे

Patil_p

फिश मार्केटच्या विकासासाठी 50 लाखाचे अनुदान मंजूर

Patil_p

सहय़ाद्री सोसायटी अध्यक्षपदी निवड झाल्याने पी. पी. बेळगावकरांचा सत्कार

Omkar B

घरोघरी गौरीच्या जेवणाचा थाट

Amit Kulkarni
error: Content is protected !!