तरुण भारत

भाऊराव काकतकर महाविद्यालयात झंकार, भित्तीपत्रकाचे अनावरण

प्रतिनिधी /बेळगाव

भाऊराव काकतकर महाविद्यालयात नुकतेच झंकार आणि भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभा नाईक, अर्जुन पुरस्कार विजेते मुकूंद किल्लेकर उपस्थित होते.

Advertisements

यावेळी शोभा नाईक यांनी आपल्यातील सुप्तगुण विविध कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुकूंद किल्लेकर यांनी शिक्षणाबरोबर शारीरिक आणि मानसिक विकास होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. रिहान याने स्वागतगीत सादर केले. प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कला विभागाचे चेअरमन प्रा. अनिता पाटील, प्रा. ए. एस. कुलकर्णी, बी. आय. वसुलकर, प्रा. नीता जाधव, प्रा. व्ही. वाय. पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अदिती आवडण यांनी तर श्रावणी चौगुले यांनी आभार मानले.

Related Stories

सीमावासियांना न्याय देण्याची मागणी

Amit Kulkarni

दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकाऱयांचे आवाहन

Patil_p

कव्य निर्मितीसाठी प्रतिभा-स्फूर्ती आवश्यक

Patil_p

थांबलेल्या ट्रकला अपघात : चालकासह दोघे ठार

Amit Kulkarni

काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

खानापूरला विशेष अनुदान मंजूर करा

Omkar B
error: Content is protected !!