तरुण भारत

खानापुरातील शेतकऱयांना एकरी 20 हजार भरपाई द्या

उत्तर कर्नाटक विकास पार्टी व क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

बातमीदार /खानापूर

Advertisements

अवेळी पडलेल्या पावसामुळे खानापूर तालुक्मयातील अनेक शेतकऱयांच्या भातपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी 20 हजार रुपये नुकसानभरपाई  सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱयांना द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन उत्तर कर्नाटक विकास पार्टी व छत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने  बेळगाव जिल्हाधिकाऱयांना  देण्यात आले आहे. 

पावसामुळे भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना सरकारने प्रती गुंठा 68 रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. सदरची नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱयांचा अपमान आहे.

पावसामुळे शेतकऱयांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय नंदगड येथील शेतकऱयांच्या शेतात पाळीव डुक्करांनी मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याने सदर संतप्त शेतकऱयांनी ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेण्याचा प्रयत्न चालवला, ही शोकांतिका आहे. त्यातच वड्डेबैल येथील एका शेतकऱयाने शेतातील सर्व पिकाचे नुकसान झाल्याने वैतागून आत्महत्या केली. हा प्रकार सोचनिय आहे. याचा विचार करून शेतकऱयांना आता एकरी 20 हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देताना विनायक माळदकर, निवृत्त कॅ. चांगाप्पा पाटील, गणेश कदम, संजय भोसले, स्वाती कदम, अभिलाष देसाई आदीसह व शेतकरी उपस्थित होते. सदर निवेदन सरकार दरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन दिले.

Related Stories

अवैधरित्या असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे हटविण्याचे आदेश

Amit Kulkarni

मोटारसायकली चोरणाऱया युवकास अटक

Amit Kulkarni

शिवसेना नेत्यांवर बेळगावात एफआयआर

Patil_p

धामणेतील बसवाण्णा मंदिरात घातला अभिषेक

Patil_p

बेळगाव येथील महिलेसह आणखी दोघांना कोरोना

Patil_p

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन अतिरिक्त न्यायाधीशांनी घेतली शपथ

Sumit Tambekar
error: Content is protected !!