तरुण भारत

कॅशिअरनेच मारला एटीएमच्या कॅशवर डल्ला

वार्ताहर /विजापूर

एटीएम फोडून रक्कम पळविलेल्या युनियन बँकेची कॅशिअर, शिपायासह आठ जणांना पकडण्यात मुद्देबिहाळ पोलिसांना यश आले. गुरुवार 18 रोजी रात्री सदर चोरटय़ांनी एटीएम फोडून 16 लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र, पोलिसांनी कसून तपास करून या चोरटय़ांना पकडले असून त्यांच्याकडून 13 लाख 18 हजाराची रोकड, एटीएमचे तीन कॅशबॉक्स, एक कार असा एकूण 18 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कॅशिअर निमिता शराबी, शिपाई विठ्ठल मंगळूर, मंजुनाथ बिनळमठ, बसवरा मेटी, सुरेश देवरहिप्परगी, मुत्तू देवरहिप्परगी, नागराज गोल्लर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कॅशिअर निमिताने एटीएमचा पासवर्ड बघून शिपाई विठ्ठल व मंजुनाथच्या मदतीने हा डाव साधला होता. विशेष म्हणजे सदर एटीएममध्ये सीसीटिव्ही नव्हता.

Advertisements

याबाबत समजलेली माहिती अशी, गुरुवार 18 रोजी मध्यरात्री कॅशिअर निमिता, शिपाई विठ्ठल, मंजुनाथ व अन्य साथीदारांनी मुद्देबिहाळ येथील हुडको कॉलनीतील युनिअर बँकेच्या एटीएमचे शटर तोडून आत प्रवेश केला. यानंतर निमिताने दिलेल्या माहितीच्या आधारे एटीएम लॉगईन व पासवर्ड वापरून एटीएममधील 16 लाख लंपास केले होते. चोरटय़ांनी एटीएममध्ये सीसीटिव्ही नसल्याने बरोबर डाव साधून रोकड लांबविली. शुक्रवार 19 रोजी सकाळी बँकेचे कर्मचारी बँकेत आले असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यानंतर कर्मचाऱयांनी ही माहिती बँक अधिकाऱयांना दिली. त्यानंतर याबाबतची फिर्याद मुद्देबिहाळ पोलिसात दाखल करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख एच. डी. आनंदकुमार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत चोरटय़ांच्या शोधासाठी पथकाची नेमणूक केली. या घटनेनंतर कॅशिअर निमिता व शिपाई विठ्ठल कामावर हजर झाले नव्हते. या माहितीच्या आधारे  सदर पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत चोरटय़ांच्या शोधासाठी म्हैसूर, कोप्पळ, कलबुर्गी येथे छापे टाकून शोधमोहीम राबविली. तीन दिवस शोधमोहीम राबविल्यानंतर मंगळवार 30 रोजी खबऱयाच्या महितीच्या आधारे नियोजबद्ध सापळा रचून सदर चोरटय़ांना जेरबंद करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून 18 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई अतिरिक्त पोलीसप्रमुख डॉ. राम अरसिद्धी, डीवायएसपी अरुणकुमार कोळूर, मुद्देबिहाळचे सीपीआय आनंद वाघमोडे, पीएसआय रणुका छाबनूर व सहकाऱयांनी केली. केवळ तीन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावल्याने जिल्हा पोलीसप्रमुख आनंदकुमार यांनी पथकाचे कौतुक करून बक्षीसही जाहीर केले. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलिसात झाली असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Related Stories

आयसीएमआर, बिम्स-किम्समध्ये समन्वय करार

Amit Kulkarni

नो-पार्किंगबाबत दुचाकी लक्ष्य, चारचाकींकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

संसार-नाती जपण्यात महिला आघाडीवर

Amit Kulkarni

खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक

Patil_p

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली फेब्रुवारी पर्यंतची मुदत

Rohan_P

बाची येथील शाळेसाठी स्वयंपाक खोली, शेड मंजूर करण्याची मागणी

Omkar B
error: Content is protected !!