तरुण भारत

बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टोला स्कॉटलँड स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदक

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

गोव्याची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टोने स्कॉटलँड येथे झालेल्या स्कॉटीश ओपन 2021 आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. तनिशाने छत्तीसगडचा आपला दुहेरीतील जोडीदार इशान भटनागरच्या साथीने मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठली होती.

Advertisements

ग्लॅस्गो येथे झालेल्या या स्पर्धेत तनिशा-इशान जोडीने उपान्त्यपूर्व फेरीत स्कॉटलंडची आठवे मानांकनप्राप्त आलेक्सझांडर डून व स्कोसियारा टॉरेन्स जोडीचा 21-14, 21-11 असा पराभव करून उपान्त्य फेरी गाठली होती. उपान्त्य फेरीत तनिशा-इशानने डॅन्मार्कच्या जॅस्पर टॉफ्ट व डॅनक्लारा ग्रेवरसन जोडीला 21-19, 21-14 असे हरविले आणि अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीत त्यांना पाचवे मानांकन लाभलेल्या इंग्लंडच्या कॅलम हॅमींग व जेसिका पग या जोडीने 21-15, 21-17 असे हरविले.

Related Stories

धारबांदोडा तालुका विद्यानगरी म्हणून ओळखला जाणार

Omkar B

केपेतील नरकासुर वध स्पर्धेत पुरुषम्हारू कला मंडळ प्रथम

Patil_p

भगवान महावीर अभयारण्याच्या जमिनीचा वापर प्रकल्पांसाठी

Omkar B

म्हापसा अर्बनचे अन्य कर्मचारीही सेवामुक्त

Patil_p

पोरस्कडे येथे मारहाणीची घटना

Amit Kulkarni

मोरजी येथील अपघातात मांगेलीतील युवकाचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!