तरुण भारत

भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रीना साप्ते, तृप्ती बाणावलीकर यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा येथील भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रीना साप्ते आणि तृप्ती बाणावलीकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी विद्यार्थी सेना अध्यक्ष राजेश मराठे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्य प्रमुख जितेश कामत आणि सरचिटणीस मिलिंद गावस उपस्थित होते.

Advertisements

सौ. रीना आणि सौ. तृप्ती या निवृत्त शिक्षिका असून समाजकारणात सक्रिय आहे. सौ. बाणावलीकर या विद्या प्रबोधिनीच्या माजी संस्थापक सदस्य आहेत. त्या गणेश विद्यामंदिर, गणेशपुरीच्या मुख्याध्यापक होत्या. 12 महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून त्या विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहेत. सौ. साप्ते या विविध हस्तकलेत पारंगत असून महिला सबलीकरणासाठी गरजू महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्याबरोबरच ऑनलाईन प्रशिक्षण देतात. सौ. साप्ते यांची म्हापसा मतदारसंघ महिला आघाडी संघटकपदी तर सौ. बाणावलीकर यांची सहसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने म्हापसा मतदारसंघात पक्ष आखणी बळकट होण्यास मदत होईल. गोव्यात भाजपचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे मुळ भाजप कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. ध्येय धोरणे समांतर असल्याने असंख्य भाजप कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत असे मत शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले. आजतागायत म्हापशात खोर्ली, कुचेली आणि गणेशपुरी येथे शिवसेनेतर्फे महिला सबलीकरण वर्ग घेण्यात आले आहेत. महिलांसाठी स्वास्थ्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. सौ. साप्ते आणि सौ. तृप्ती म्हापशात विविध ठिकाणी महिला सबलीकरणासाठी कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती कामत यांनी दिली.

Related Stories

स्पोर्टिंग क्लुब दी गोवा राज्य फुटसाल स्पर्धेचे चॅम्पियन्स

Amit Kulkarni

दिवसेंदिवस वाढतोय कोरोनाचा विळखा

Omkar B

सरदेसाई यांनी जाब विचारल्यानंतर सरकारला जाग

Amit Kulkarni

‘शॅडो कौन्सिल’कडून 650 मास्क, 2 हजार हातमोज्यांचे वितरण

Omkar B

आयवर्मेक्टिन औषधाचा प्रयोग गोमंतकीयांवर करणार का ?

Amit Kulkarni

गोव्यात निवडणुकीचा ‘व्हॅलेंटाईन’ 14 फेब्रुवारी

Patil_p
error: Content is protected !!