तरुण भारत

होडर येथील धोकादायक बसथांबा निवारा कोसळला

प्रतिनिधी /कुडचडे

होडर, कुडचडे येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला बऱयाच काळापासून कमकुवत होऊन मोडकळीस आलेला बसथांबा निवारा सोमवारी अचानक कोसळला. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही.

Advertisements

होडर येथे कुडचडे-चांदर रस्त्यावर प्रवाशांसाठी बांधलेला बसथांबा निवारा जुना झाला होता व एकदम मोडकळीस आला होता. तरी पण यात कोणत्याच लोकप्रतिनिधीने लक्ष घातले नव्हते. सदर बसथांबा निवाऱयाचा होडर येथील लोकांना तसेच खास करून शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर उपयोग होता. पण सदर निवाऱयाची वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे तसेच प्रवाशांना निवाऱयाची अन्य सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक जीव धोक्मयात घालून सदर कमकुवत झालेल्या बसथांबा निवाऱयाचा उपयोग करत होते. याची कोणीच दखल न घेतल्याने व सोमवारी अचानक निवारा कोसळल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर बसथांबा निवारा दुरुस्त करण्यासाठी स्थानिक आमदारांनाही कळविण्यात आले होते. पण त्यावर कोणतीच पावले उचलण्यात आली नाही. सुदैवाने निवारा आंत कोणीच नसताना कोसळला. त्यामुळे आलेले संकट देवानेच दूर केले, अशी प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे. धोकादायक स्थितीत असलेला बसथांबा निवारा कोसळल्याने होत असलेली अडचण लक्षात घेऊन येथील समाजसेवक जॉयल मोरेस यांनी स्वतःची जेसीबी आणून सदर जागा ताबडतोब साफ केली. यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Related Stories

विश्वासार्हता म्हणजे ‘लोकमान्य’ सोसायटी

Patil_p

वारखंडे-फोंडा येथे आज वीरभद्र

Patil_p

मडगावात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे तीन तेरा

Omkar B

गोवा काँग्रेसची हुबळीत रेल्वे मुख्यालयावर धडक

Patil_p

डेन्मार्कच्या ‘इन्टू द डार्कनेस’ चित्रपटाला सुवर्णमयूर

Amit Kulkarni

दिशा रवीला अटक प्रकरणी महिला काँग्रेसकडून निषेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!