तरुण भारत

पत्नी-मुलीला पाहून अमित पालेकर झाले भावूक

मात्र निर्धारावर ठाम : जुने गोवेतील उपोषणाचा दुसरा दिवस

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

जुने गोवे येथे वारसास्थळी चाललेल्या कथित बेकायदेशीर बांधकामाविरोधात आमरण उपोषण आरंभलेले ऍड. अमित पालेकर यांची पत्नी आणि कन्येने दुसऱया दिवशी उपोषणस्थळी येऊन भेट घेतली असता त्यांना पाहून ते अत्यंत भावूक झाले. मात्र प्रकरण पूर्णपणे निकाली लागेपर्यंत आपण निर्धारावर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ऍड. पालेकर यांच्या उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्यावेळी  पत्नी आणि लहान मुलीने त्यांची भेट घेतली. त्याशिवाय अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनीही त्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. जुने गोवे आणि गोव्याचा वारसा जपण्यासाठी आपण निर्धारावर ठाम राहणार असल्याचे ते म्हणाले.

सदर बेकायदा बांधकाम करणाऱया मालकाला जुने गोवे पंचायतीने काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. या निर्णयाचे अ??ड. पालेकर यांनी स्वागत केले आहे. मात्र सदर बांधकामास दिलेली परवानगी टीसीपी रद्द करत नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकदा टीसीपीने परवाना रद्द करण्याची नोटीस जारी केली की, लोकांचा सरकारवर निदान विश्वास निर्माण होईल. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करू, अस पालेकर म्हणाले.

येथे अनेक आमदारांनी आंदोलकांना पाठिंबा देऊनही सरकारने बेकायदा बांधकामांवर कारवाई केलेली नाही. राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळाल्यानंतर पंचायतीने काम थांबवण्याचे आदेश जारी केले. मात्र सरकार या प्रकरणी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सीआरझेड आणि पुरातत्व सर्वेक्षणाच्या दस्तऐवजांमध्ये सदर बेकायदेशीर बांधकाम केलेल्या जमिनीचे वर्णन ’बागायती मालमत्ता’ म्हणून आहे. त्यामुळे बंगला बांधण्यासाठी पंचायत आणि टीसीपीची परवानगी आवश्यक होती. परंतु, त्यांनी पाहणी केली तेव्हा अधिकारी काय करत होते? बेकायदा बांधकामास परवानगी देण्यात सर्व संबंधित अधिकारी गुंतले आहेत का? असे सवाल पालेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Related Stories

कोरोनामुळे राज्यात एकाच दिवसात तिघांचे बळी

Patil_p

वेर्ला काणकाचे सरपंच मिल्टन मार्कीस यांचे निधन

Omkar B

अ.का.प्रियोळकरांचे मराठी संशोधनात विपुल कार्य

Amit Kulkarni

धेंपो क्लब-चर्चिल ब्रदर्स प्रो. फुटबॉल स्पर्धेतील लढत बरोबरीत

Amit Kulkarni

गुळेली आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन सुरुच. आंदोलक पुन्हा रस्त्यावर

Omkar B

मोफत पाणी योजनेचा कितपत फायदा होईल हे कोडेच

Amit Kulkarni
error: Content is protected !!