तरुण भारत

वास्को काँग्रेसचे गट अध्यक्ष उलारीको रॉड्रिक्स यांचा राजीनामा

प्रतिनिधी /वास्को

वास्को गट काँग्रेसचे अध्यक्ष उलारीको रॉड्रिक्स यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हल्लीच त्यांची गट अध्यक्षपदी निवड झाली होती. चार दिवसांपूर्वीच माजी गट समितीच्या पदाधिकाऱयांनी त्यांच्यावर विश्वासात घेत नसल्याची टिकाही केली होती.

Advertisements

उलारीको रॉड्रिक्स हे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते असून यंदा वास्कोतील उमेदवारी आपल्याला मिळावी अशी ईच्छा ते बाळगून आहेत. हल्लीच गट अध्यक्षपदी निवड झालेली असताना लगेच राजीनामा देण्याचे कारणही त्यांनी माध्यमांसमोर विषद केले आहे. पक्षाचे गोवा प्रभारी व माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांनी वास्कोत कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन करताना गट अध्यक्षांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याची दखल घेऊनच आपण गट अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे. आपण काँग्रेसच्या वास्को मतदारसंघाच्या उमेदवारीचा दावेदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

आतीलपेठ मठमंदिरात 13 रोजी नवा सोमवार उत्सव

Amit Kulkarni

मोबाईलसाठी विद्यार्थी आत्महत्या करतात ही क्लेशदायी घटना

Patil_p

पिसुर्लेत बेकायदेशीर चिरेखाणीत जीवितहानी झाल्यास सरकार जबाबदार

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयातील कोवीड रुग्णांची संख्या 27

Patil_p

राज्यात आज-उद्या मुसळधार पाऊस

Amit Kulkarni

सकाळच्या सत्रात गजबजाट संध्याकाळी मात्र शुकशुकाट

Amit Kulkarni
error: Content is protected !!