तरुण भारत

गिरीजाताई केळेकर संगीत संमेलन 4 व 5 रोजी फर्मागुडीत

सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा

फोंडा पत्रकार संघ आयोजित 33 वे स्वरसम्राज्ञी गिरीजाताई केळेकर संगीत संमेलन शनिवार 4 व रविवार 5 डिसेंबर रोजी फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात साजरे करण्यात येणार आहे. संमलन समितीचे अध्यक्ष जयंत मिरींगकर यांनी    फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला.

Advertisements

 यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष संजय घाटे, स्वागताध्यक्ष रघुनाथ फडके व सचिव अनिलकुमार नाईक हे उपस्थित होते. शनिवार 4 रोजी सायं. 5 वा. गुरुदास नागेशकर व साथी कलाकारांचे सनई चौघुडावादन व त्यानंतर 5.30 वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, प्रमुख वक्ते पत्रकार राजू नायक व खास निमंत्रित म्हणून बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक व अन्य मान्यवर उपस्थित असतील.

यावेळी कलाप्रेमी व कलाकार अविनाश रामनाथकर यांचा संमेलन समितीतर्फे सत्कार होणार आहे. स्वागताध्यक्ष रघुनाथ फडके यांनी आपले गुरु पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार जनार्दन वेर्लेकर यांना प्रदान करण्यात येईल. घाटे कुटुंबियांतर्फे पुरस्कृत करण्यात आलेला स्व. लक्ष्मीकांत घाटे स्मृती पुरस्कार पं. तुळशीदास नावेलकर यांना देण्यात येणार आहे.

स्वरांजली स्मरणिकेचे प्रकाशन सरपंच राजेश नाईक यांच्याहस्ते होईल. कु. गौरांगी मिरींगकर ईशस्तवन सादर करतील. त्यांना दामोदर च्यारी व ग्रजेश तारी यांची हार्मोनियम व तबल्यावर साथसंगत करणार आहेत.

उद्घाट सोहळय़ानंतर पहिल्या सत्रात यशस्वी सरपोतदार (पुणे) यांचे गायन होईल. रविवार 5 रोजी सायं. 5 वा. बाळकृष्ण मराठे यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर रुद्राक्ष वझे तर हार्मोनियमवर अनय घाटे साथसंगत करतील. त्यानंतर 6 वा. यशवंत वैष्णव (मुंबई) यांचे तबला एकलवादन होईल. त्यांना लेहेरासाथ दत्तराज म्हाळशी करणार आहेत. रात्री 8 वा. नाटय़संगीत रजनी होणार असून त्यात शेखर कुंभोजकर (पुणे) व प्रचला आमोणकर (गोवा) या कलाकारांचा सहभाग असेल. त्यांना तबल्यावर दत्तराज शेटय़े, संवादिनीवर विठ्ठल खांडोळकर तर ऑर्गनवर प्रदीप शिलकर साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमाचे निवेदन दुर्गाकुमार नावती, धर्मानंद गोलतकर, शकुंतला भरणे व गिरीश वेळगेकर करतील. संगीत संमेलनासाठी संगीत क्षेत्रातील विद्यार्थी खास करून गोवा संगीत महाविद्यालय, गोवा कला अकादमी आदी शासकीय संस्थामधून विद्यार्जन करणाऱया विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंत मिरिंगकर यांनी केले आहे.

Related Stories

मगो-तृणमूल युतीमुळे राजकीय परिवर्तन निश्चित

Patil_p

उदय मडकईकर यांचा 4 रोजी काँग्रेस प्रवेश

Amit Kulkarni

दातांनी नारळ सोलणार्‍या नीलावती गावकर तेळय – बासरय, बाळ्ळी येथील महिला

GAURESH SATTARKAR

नोकरीतून कमी केलेल्या 20 कामगारांना पुन्हा सेवेत घ्या

Patil_p

आरोग्य खात्यावर टीका करणाऱयांनी उपाय सुचवावे – आरोग्यमंत्री राणे

Patil_p

मोफत पाणी योजनेचा कितपत फायदा होईल हे कोडेच

Amit Kulkarni
error: Content is protected !!