तरुण भारत

रेल्वे दुपदरीकरणासाठी जबरदस्तीने जमीन संपादन

गोवा फॉरवर्डकडून पर्दाफाश : राज्य, केंद्र सरकारचा जोरदार निषेध

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

लोकभावनेची कदर न करता सर्वांना अंधारात ठेवून गोवा आणि केंद्र सरकारने कोळसा वाहतुकीस डबल ट्रकिंगसाठी गोव्याची जमीन जबरदस्तीने संपादित केली आहे, असा दावा करून गोवा फॉरवर्डच्या पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत यांनी या भूसंपादनाचा पर्दाफाश केला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून भाजप सरकारने गोव्याचा आणखी विनाश केला असून या कृतीचा निषेध करतो, असे ते म्हणाले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाचे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांचीही उपस्थिती होती. भाजप गोव्यात कोळसा केंद्र करण्यास इच्छुक असून राज्यातील जमिनी संपादित करून रेल्वेच्या घशात घातल्या आहेत, अशी माहिती भगत यांनी दिली. गोवा आणि केंद्र सरकारचा हा छुपा अजेंडा असून लोकांच्या भावनांचा आदर न करता आणि सर्वांना अंधारात ठेवल्याबद्दल आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले.

सरकारने ही जमीन 1981 च्या रेल्वे कायद्यांतर्गत संपादित केली आहे, ज्याला न्यायालयात आव्हानही देता येत नाही आणि जनतेने विरोध करण्यासाठी आंदोलन केले तरी त्यांना अटक केली जाईल. अशाप्रकारे भाजप जनतेचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत आहे. डबल इंजिन सरकारने अधिसूचनेद्वारे रातोरात गोमंतकियांच्या जमिनी हडप केल्या आहेत, असे भगत म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आश्वासनाची आठवण करून देताना भगत म्हणाले की, कोळसा वाहतूक कमी करण्याचे आश्वासन त्यांनी पूर्वी दिले होते. गोमंतकीयांना फसवण्याचा त्यांचा छुपा अजेंडा होता आणि आता त्यांनी तेच केले आहे. त्यांना गोव्याला कोळसा केंद्र बनवायचे आहे, असे भगत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आता ते लोकांच्या इच्छेविरुद्ध का गेले आणि ते गोव्यात कोळसा केंद्र करण्यास का इच्छुक आहेत? ते स्पष्ट केले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्र्यांना गोव्याबद्दल काही कळकळ असेल तर त्यांनी ही प्रक्रिया रद्द करण्यासाठी पावले उचलावी, असे आवाहन भगत यांनी केले.

गोमंतकीयांना अंधारात ठेवून भाजपने जमिनी बळकावण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो असे भगत म्हणाले.

Related Stories

मुरगावच्या पालिका इमारत प्रकरणात सहा कोटींच्या भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा आरोप

Amit Kulkarni

गोमेकॉत पदव्युत्तर प्रवेशासाठी राखीवतेचा निकष लावा

Amit Kulkarni

महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे वास्कोचे आमदार नाराज, अभियंत्याविरूद्ध कारवाईची मागणी

Patil_p

वीजेचा खांब कोसळून ‘त्या’ दुसऱया जखमी युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

खासगी बसगाडय़ा भाडेपट्टीवर घेण्यास सरकार तयार

Omkar B

’मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’चे उद्या प्रकाशन

Patil_p
error: Content is protected !!