तरुण भारत

गोव्यात नांदतोय आनंदी आनंद!

‘इंडिया टुडे’च्या सर्वेक्षणानुसार गोवा सर्वांत आनंदी राज्य

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

‘इंडिया टुडे’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लहान राज्यांच्या यादीत ‘आनंद’ या संकल्पनेत गोव्याने बाजी मारली असून राज्याला पुरस्कार प्राप्त झाला आहे. लहान राज्यामध्ये गोवा राज्य सर्वात जास्त आनंदी असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

 शिक्षण, साधनसुविधा, स्वच्छता या बाबतीत गोवा राज्य आनंदी असल्याचे सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. पर्यटनातही गोवा सर्वाधिक आनंदी ठरल्याचे अहवाल म्हणतो. लहान राज्यातील आनंदी निर्देशांकात गोवा राज्य अव्वल ठरल्याचे अहवालातून समोर आले आहे.

ग्लोबल हॅपिनेस कौन्सिलतर्फे राष्ट्रीय स्तरावरील अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यात विविध राज्यांची विविध क्षेत्रातील आनंदाबाबतची स्थिती काय आहे याचे सर्वेक्षण केले जाते. इंडिया टुडेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात गोव्याला अव्वल मानांकन मिळाले आहे.

गोवा राज्याला गेल्या काही वर्षात अशा प्रकारचे अनेक पुरस्कार लाभले असून लहान राज्य असल्याने त्याचा लाभ गोव्याला मिळतो असे दिसून आले आहे. या मानांकनामुळे गोव्याचे देशभरात कौतुक होत आहे.

Related Stories

सूर्याजी महात्मेंची ‘वेषधारी पंजाबी’ पुन्हा वाचकांच्या भेटीस…!

Omkar B

वागातोर येथे रेव्ह पार्टी उधळली

Patil_p

प्राणीमित्रांच्या जागृतीमुळे नागांचे बळी घटले

Omkar B

क्रीडा क्षेत्रात शिखर गाठण्यासाठी शिस्त व चिकाटी आवश्यक -गीतेश वेरेकर

Amit Kulkarni

म्हादईप्रश्नी जनता सरकारला धडा शिकवेल

Patil_p

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा

Amit Kulkarni
error: Content is protected !!