तरुण भारत

आरपीडी कॉर्नर येथे पिझ्झा हटचे उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

चटपटीत, चमचमीत खाद्यपदार्थांची तरुणाईची आवड लक्षात घेऊन बेळगावमध्ये मंगळवारी पिझ्झा हटचे उद्घाटन करण्यात आले. तरुणाईने सतत गजबजलेल्या आरपीडी कॉर्नर येथे पिझ्झा हट सुरू झाला आहे. आयन मॅन मयुरा व मिहीर शिवलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पिझ्झा हट बेळगावकरांच्या सेवेत रुजू करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशीच या पिझ्झा हटला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन झाल्याझाल्या तरुणाईने पिझ्झा हटमध्ये एकच गर्दी केली.

Advertisements

या पिझ्झा हटमध्ये चिकन बी डबल, डबल चिकन सोसेस, चिकन पेपर अशा अनेक स्वादाचे पिझ्झा उपलब्ध आहेत. याशिवाय पास्ता मॅजिक, पिझ्झा डेझर्ट खवय्यांची रसना तृप्त करतील. बेळगावमध्ये अत्यंत मोक्मयाच्या ठिकाणी आम्ही पिझ्झा हट सुरू करत आहोत. येथील सर्व स्टाफला योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून कमवा व शिका या योजनेखाली सुद्धा येथे विद्यार्थी काम करत आहेत. उद्घाटनाच्या दिवशीच मिळालेला प्रतिसाद पाहता या पिझ्झा हट मधील पिझ्झा बेळगावकरांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास पिझ्झा हटचे मार्केटिंग हेड कौशिक बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा सुध्दा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर केरळ आणि कर्नाटक रिजनमधील ही पन्नासावी फ्रॅचाईजी आहे. होम डिलीवरीची सेवा सुद्धा आपण देत आहोत असे कर्नाटक आणि केरळ विभागाचे मार्केटिंग मॅनेजर साजू यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. यावेळी एरीया कोच दिनेशकुमार व कर्नाटक आणि केरळ रिजनचे असिस्टंट मॅनेजर बिकास शर्मा यांनी सर्वांचे स्वागत केले.

Related Stories

बुधवारी पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम

Patil_p

बेकिनकेरेत पहाटेच्यावेळी वासूदेवाची स्वारी

Patil_p

पॅनकार्ड क्लबमधील रक्कम गुंतवणूकदारांना द्या

Patil_p

ऊस बिलासाठी शेतकऱ्याने स्वतःच खोदली स्वतःची समाधी

Rohan_P

सायकल चोरी प्रकरणी तरुणाला अटक

sachin_m

नंदिहळळीत शुभांगी भाताचे विक्रमी पिक

Omkar B
error: Content is protected !!