तरुण भारत

सांगली शहरात लव्हली सर्कल जवळ तरुणाचा खून

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लव्हली सर्कल ते मंगळवार बाजारच्या आतील रस्त्यावर फिरोज शेरअली शेख वय ४० सध्या रा. शिंदेमळा, सांगली. मुळ गाव मिरज याचा त्याच्या ओळखीच्या दोघा तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज शेरअली शेख हा शिंदेमळा येथे त्याच्या सासुरवाडीत राहतो. त्याचे मुळगाव मिरज आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही तो दारूच्या नशेत होता. त्याचवेळी त्याच्या ओळखीच्या लोकांनीच त्याच्याशी वाद झाल्यावर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

बुधवारी पहाटे जखमी अवस्थेत त्याला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता तो मयत आढळून आला. त्यामुळे संजयनगर पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय श्रीरसागर यांनी दिली

Advertisements

Related Stories

मिरजेत अडीच किलो गांजा जप्त, एकास अटक

Abhijeet Shinde

सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या तिघांना अटक

Abhijeet Shinde

सिंधुदुर्गचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगली – कोल्हापूरहून ५०० कर्मचारी

Abhijeet Shinde

सराफी पेढीतील चेन पळविणाऱ्या जोडगोळीला अटक

Rohan_P

मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर गुरुवारी सांगली दौर्‍यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!