तरुण भारत

मास्क वापरासाठी महापालिकेकडून जागृती

मास्क वापरणे बंधनकारक : विना मास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र मास्क वापरण्याकडे शहरवासियांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मास्क वापरण्याबाबत जनजागृती करण्यासह विना मास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत असतानाच नव्या व्हेरिएंटचा शिरकाव वाढत आहे. काही देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार वाढल्याने धास्ती वाढली आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाला आहे. बेळगाव शहरात कोरोना विषाणूचे लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटली होती. त्यामुळे शहरवासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परिणामी तोंडावरील मास्क हटले होते. मात्र अलिकडे नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे.

 विविध देशात तसेच भारतातही काही राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाय-योजना राबविण्यास आरोग्य विभागाने धावपळ सुरू केली आहे. मुख्यतः विषाणूचा प्रसार होवू नये, याकरिता मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्कची सक्ती करण्यात येत असून याबाबत महापालिकेच्यावतीने देखील कारवाई हाती घेतली आहे. बाजारपेठ, विविध चौक आणि शहराच्या विविध भागात जागृती मोहीम राबवून विना मास्क फिरणाऱया नागरिकांकडून 250 रुपये दंड आकारणी करण्यात येत आहे. बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी माईकद्वारे मास्क वापरण्याची सूचना करण्यात येत आहे.

Related Stories

शुक्रवारीही बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या दुप्पट

Patil_p

जनावरांच्या बाजाराला अखेर प्रारंभ

Patil_p

बेंगळूरचा के.रूबल ‘मि.पंचमुखी’ किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

विजया, एसकेई संघ विजयी

Amit Kulkarni

लाच स्वीकारताना सहकार खात्याचा कर्मचारी एसीबीच्या जाळय़ात

Amit Kulkarni

मेरडा गावच्या महाबळेश्वर पाटील यांना वाढता पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!