तरुण भारत

LPG सिलेंडर स्वस्त होण्याऐवजी १०० रुपयांनी महागला

गेल्या महिन्यात सिलेंडर 2६६ रुपयांनी महागला; यात पुन्हा १०० रुपयांची वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

Advertisements

महाग होत चाललेल्या इंधनदर वाढीमुळे सामान्य नागरिकाचे अर्थिक गणित कोलमडले आहे. मुठभर धनदांडग्यांना याचा काही फऱक पडत नसला तरी सामान्य नागरिकांना वाढत जाणाऱ्या खर्चाने पुरते हैराण केले आहे. याच पार्श्वभुमीवर गेल्या महिन्यात सिलेंडर 266 रुपयांनी महागल झालेला एलपीजी सिलेंडर आता स्वस्त होईल अशी अपेक्षा नागरीकांना होती. मात्र LPG सिलेंडर स्वस्त होण्याऐवजी तो १०० रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे आज पुन्हा गॅस सिलेंडरच्या महाग झाल्यामुळे आणखी एक झटका सामान्य नागरिकांना बसला आहे.

मोदी सरकार पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र मोदी सरकार अजुन ही सामान्य नागरिकांची अर्थिक कुचंबणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कदाचित सत्ता हातावेगळी झाल्यास लक्षात येणार आहे का ? कारण सत्ता कोणत्या ही पक्षाची असेल तरी सामान्यांकडे दुर्लक्ष करणे कोणत्या ही पक्षाला हीतावह नाही. यातील सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे. सहा ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला त्याची किंमत ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती. जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी वाढून ८५९.५० रुपये झाले. यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.

Related Stories

टोळी युद्धातून खुनाचा कट उधळला

Patil_p

अफगाणिस्तानच्या निर्वासित महिला नेत्या संयुक्त राष्ट्राला प्रथमच देणार भेट

Abhijeet Shinde

भारतीय वंशाच्या CEO चा एक कॉल आणि ९०० कर्मचारी झाले बेरोजगार

Abhijeet Shinde

कोरोनाची धास्ती : नागपुरात लागू असलेले निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम

Rohan_P

महिला यू-17 वर्ल्ड कप नियोजित वेळेत होण्याची आशा

Patil_p

केबल कट ; करमणूक थांबली

Patil_p
error: Content is protected !!