तरुण भारत

हलगा-मच्छे बायपासची सुनावणी पुन्हा लांबणीवर

3 डिसेंबर रोजी होणार सुनावणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता मूळ वादावरच मंगळवारी निकाल लागणार होता. मात्र न्यायालयाने 3 डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तोपर्यंत स्थगिती मात्र कायम केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी सोमवारी पुन्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद केला होता. त्यामुळे मंगळवारी त्याची सुनावणी होणार होती. पण न्यायालयाने पुन्हा या खटल्याची सुनावणी लांबणीवर टाकली आहे. आता न्यायाधीश कोणता निकाल देणार? याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. शेतकऱयांच्या बाजूने ऍड. रवीकुमार गोकाककर यांनी बाजू भक्कमपणे मांडली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनीही न्यायालयासमोर युक्तिवाद केला आहे. मात्र पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Related Stories

ग्लोब थिएटरजवळ ट्राफिक सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा

Patil_p

कर्नाटक: पत्नीची आठवण म्हणून घरी बसविला सिलिकॉनचा पुतळा

Abhijeet Shinde

समर्थनगर येथील माउली ग्रुपतर्फे अन्नधान्य वाटप

Amit Kulkarni

राज गावडे ‘मि.बॉडीलाईन’चा मानकरी, संदीप अंगडी उत्कृष्ट पोझर

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील अबनाळी गाव झाले सीलडाऊन

Amit Kulkarni

ओलमणीजवळ कॅन्टर पलटी होऊन क्लिनर जागीच ठार

Patil_p
error: Content is protected !!