तरुण भारत

गॅस सिलिंडर महागला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज 100 रुपयांची वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

Advertisements

मागील महिन्यात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 266 रुपयांनी महागला होता. आज तो 100 रुपयांनी महागल्याने दिल्लीत त्याची किंमत 2100 रुपयांपेक्षा अधिक आहे. दोन महिन्यापूर्वी तो 1733 रुपयांना मिळत होता. मुंबईत 19 किलोचा सिलिंडर 2051 रुपयांना तर कोलकातामध्ये 2174.50 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये 19 किलोच्या या सिलिंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. 6 ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे.

Related Stories

नवीन कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ हरियाणातील शेतकरी संघटनांचे कृषिमंत्र्यांना पत्र

datta jadhav

पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा – सहकारमंत्री

Sumit Tambekar

8 राज्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडी

Amit Kulkarni

हबीबगंज रेल्वे स्टेशनला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या

datta jadhav

कामावर असताना मल्याळम भाषा वापरु नये; दिल्ली सरकारची हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस

Abhijeet Shinde

‘साहित्य संगम’- साहित्य सेवेचा अखंडित नंदादीप

Patil_p
error: Content is protected !!