तरुण भारत

हारुगेरी पोलिसांकडून चोरटय़ांना अटक

20 लाखांचा मुद्देमाल जप्त, किंमती ऐवजाचा समावेश : चोरटे कोप्पळ जिल्हय़ातील

वार्ताहर /रायबाग

Advertisements

विविध जिल्हय़ांतील मंदिरांमध्ये चोरी करून फरारी असलेल्या दोघा चोरटय़ांना पकडण्यात हारुगेरी पोलिसांना यश आले आहे. शरणप्पा एम. तुळूगेर व संगप्पा हरीजन अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचा ऐवज  जप्त करण्यात आला आहे. यात चांदीचे दागिने, दोन मोबाईल, कार, दुचाकी आदींचा समावेश आहे.

हे दोघेही कोप्पळ जिल्हय़ातील रहिवासी असून खणदाळ येथील हुलकांतेश्वर मंदिर, गोडची येथील कालिकादेवी मंदिर यासह बागलकोट, गदग, विजापूर, रायचूर जिल्हय़ातील विविध मंदिरांमध्ये त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबरोबरच आणखी चोऱया उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांनी तपासकार्य हाती घेतले आहे. सदर चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, अथणीचे डीएसपी एस. व्ही. गिरीष यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे सीपीआय के. एस. हट्टी, फौजदार आर. आर. कंगनोळी, राघवेंद्र खोत, पुरुषोत्तम नाईक, अशोक शांडगे, बसवराज होसट्टी, प्रकाश सप्तसागर, कुमार पवार, हणमंत अंबी, बेबी शिरगुर आदींनी ही कारवाई केली.

Related Stories

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी निवारा केंद्रांची उभारणी करा

Patil_p

जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांना नवदुर्गा सन्मान प्रदान

tarunbharat

सोमवारी 738 रुग्ण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

गणेश मल्टीपर्पज सोसायटीला 15 लाखांहून अधिक नफा

Patil_p

आडी सिद्धेश्वर मठ जीर्णोद्धाराची मागणी

Patil_p

तलावासाठी कणबर्गी शेतकऱयांचा बैलगाडी मोर्चा

Patil_p
error: Content is protected !!